देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाच्या नव्या 403 रूग्णांची नोंद झाली असून सध्या भारतात 5026 सक्रिय रुग्ण आहेत.
( हेही वाचा : समृद्धी महामार्गावरून रात्रीचा प्रवास धोकादायक! कुठे दगडफेक, तर कुठे लूटमार)
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशव्यापी राबवलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत जवळपास 220.64 कोटी डोस देण्यात आले आहेत. केंद्राने काही राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह दरात वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यावर तातडीने नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले असून प्रशासनाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा असे आवाहन निती आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे.
केंद्र सरकार सतर्क
इन्फ्लूएंझाचा एच-3एन-2 विषाणू देशातील अनेक राज्यांमध्ये पसरला आहे. या विषाणूमुळे कर्नाटक आणि हरियाणामध्ये दोघांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. या संसर्गापासून बचाव करण्यासाठी निती आयोगाने गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. आयोगाने लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असा सल्ला दिला आहे.
Join Our WhatsApp Community