‘या’ देशांत पुन्हा वाढतोय कोरोनाचा ताप

गेल्या काही आठवड्यांत येथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.

95

जेव्हा संपूर्ण जगाला लसीकरणाची गरज होती, तेव्हा स्वत:ला महासत्ता म्हणवून घेणा-या देशांनी जगातील जवळजवळ आपल्या लोकसंख्येच्या दुप्पट लसी आगाऊ बूक केल्या होत्या. गरीब देशांचा विचार न करता या देशांनी लसींचं राजकारण केलं होतं. भारताने आताच शंभर करोड लसीकरण पूर्ण केलं आहे. जगात भारत लसीकरणात अग्रेसर बनला आहे.

भारतात वेगाने झालेल्या लसीकरणामुळेच भारताला तिस-या लाटेचा धोका नसल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं. त्यामुळे भारतासारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशात कोरोना आटोक्यात असताना रशिया, ब्रिटन, अमेरिका आणि चीनसारख्या देशांत मात्र कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू होत आहेत.

(हेही वाचाः १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण! देशभर ‘असे’ होतेय सेलिब्रेशन!)

चीनमध्ये पुन्हा वाढतोय कोरोनाचा उद्रेक 

चीनच्या वुहानमधून जगभरात कोरोनाचे संक्रमण झाले होते. आता चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चीनमध्ये शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक हवाई उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत. राजधानी बिजींगसह 5 प्रांतांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच कोरोना चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा कार्यरत आहेत. चीनमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याने हा कोरोनाचा नेमका कोणता व्हेरिंएट आहे, याचाही शोध घेण्यात येत आहे.

रशियात लसीकरणाचा वेग कमी

रशियात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. तिथे मागच्या 24 तासांत 1 हजार 24 लोकांचा मृत्यू झाला आहे. रशियात कोरोना बळावण्यावर स्पष्टीकरण देताना रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी संथ गतीने होणा-या लसीकरणाला जबाबदार ठरवले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुतीन यांनी कर्मचा-यांना एक आठवड्याची पगारी रजा जाहीर केली आहे. 30 ऑक्टोबरपासून देशभरात आठवड्याभरासाठी ही पगारी रजा कर्मचा-यांना दिली जाणार असल्याचे पुतीन यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी लसीकरणाला पाठिंबा द्यावा आणि लस घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. रशियामध्ये स्पुतनिक-व्ही लसीची उपलब्धता असूनही, येथे केवळ 35 टक्के लोकांचेच संपूर्ण लसीकरण होऊ शकले आहे. गेल्या काही आठवड्यांत येथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.

(हेही वाचाः इंडोनेशियात मशिदींवरील भोंग्यांचा आवाज कमी, भारतात कधी?)

ब्रिटनमध्ये दिवसाला इतके मिळतायत रुग्ण

ब्रिटनमध्ये कोरोनाशी दोन हात करण्यासाठी लवकरच लसीला मान्यता देण्यात आली होती. तसेच सतत उपाययोजना आखल्या जात आहेत. असे असूनसुद्धा ब्रिटनमध्ये सध्या दिवसाला 35 ते 40 हजार कोरोना रुग्ण आढळत आहेत. ब्रिटनमध्ये जीवघेण्या कोरोनाच्या डेल्टा व्हायरसचे रुग्णही आढळत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.