ओमायक्राॅन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे सध्या जग भीतीच्या सावटाखाली जगत आहे. त्यातच महाराष्ट्रात या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईत लसीकरणाला प्राधान्य देण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. लसीकरणाला लोकांनी उत्तम प्रतिसाद द्यावा, यासाठी मुंबई महानरपालिकेने लसीकरण केंद्रे जास्त वेळ कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री 11 वाजेपर्यंत ही लसीकरण केंद्रे सुरु ठेवण्यात येणार आहेत. याचा फायदा सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. सध्या ही केंद्रे प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आली आहेत.
विशेष कार्यक्रम
ही लसीकरण केंद्रे रेल्वे स्थानक परिसरात सुरु करण्यात आली असल्याने कामगार वर्गाला या केंद्रांचा फायदा होणार आहे. मुंबईतील प्रत्येक प्रभागात सध्या अशी किमान दोन लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. याआधी ही लसीकरण केंद्रे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरु असल्याने अनेक नागरिकांना लस घेता येत नव्हती, पण आता या विशेष कार्यक्रमामुळे अनेकांना याचा फायदा होणार आहे.
अनेकांना होणार फायदा
या रात्रीच्या लसीकरण केंद्राचा फायदा मुंबईमधील नोकरदार, कष्टकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर होणार आहे. कामावरून घरी परताना लस घेणे त्यांना शक्य होणार आहे. अनेकजण नोकरी, रोजगारासाठी सकाळी घराबाहेर पडल्यानंतर रात्रीच्या वेळी घरी परततात. त्यामुळे अनेकांना लस घेणे शक्य होत नाही. त्याशिवाय, अनेकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. मात्र, दुसरा डोस घेण्याची वेळ आली तरी त्यांना वेळेअभावी, आवश्यकेतेनुसार लस घेण्यासाठी वेळ मिळाला नाही. अशांना या रात्रीच्या लसीकरण केंद्राचा मोठा फायदा होणार आहे.
( हेही वाचा :…अन् फडणवीसांना बिलगून बावनकुळेंना आनंदाश्रू झाले अनावर )
Join Our WhatsApp Community