पशुपक्ष्यांना जीवनदान देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा राजभवनात सत्कार

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून गेले वर्षभर जैसल पार्क चौपाटी कल्याण समितीच्या जीवप्रेमी कार्यकर्त्यांनी पशुपक्ष्यांना अन्न, आजारी प्राण्यांवर उपचार, भटक्या प्राण्यांची नसबंदी तसेच मृत प्राण्यांवर अंत्यसंस्कार केल्याचे अध्यक्ष डॉ मोतीलाल गुप्ता यांनी सांगितले.

 

जडापासून चैतन्यापर्यंत, चलापासून अचलापर्यंत आणि मनुष्यमात्रांपासून पशुपक्ष्यांपर्यंत सर्वांमध्ये परमात्म्यामाला पाहणे हे भारतीय संस्कृतीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य आहे. सर्वच धर्म व पंथांनी पशुपक्ष्यांप्रती दया व करुणेची शिकवण दिली आहे, असे सांगून ज्या लोकांनी कोरोना काळात पशुपक्षांची सेवा करून त्यांना जीवनदान दिले त्यांनी दैवी कार्य केले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

भायंदर (पूर्व) येथील जैसल पार्क चौपाटी कल्याण समिती या समाजसेवी संस्थेच्या वतीने कोरोना काळात पशुपक्ष्यांच्या अन्नपाणी व आरोग्याची काळजी घेणाऱ्या १५  जीवप्रेमी कोरोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते रविवारी १४ मार्च रोजी राजभवन येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोतीलाल गुप्ता उपस्थित होते.

यांचा सत्कार करण्यात आला!

सक्षम फाउंडेशनचे अनुज सरावगी, सीए लीलाधर मोर, सीए नितेश कोठारी, सीए निकुंज भंगारिया,  शुभांगी योगेश लाड, संतोष कुचेरिया,  हेमलता सिंह, सीए पवन अग्रवाल, सीए अमित अग्रवाल, सुभाष चंद्र जांगिड़, देवकीनंदन मोदी, सुमित अग्रवाल, भरतलाल अग्रवाल, नरेंद्र गुप्ता, व मोतीलाल गुप्ता यांना मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here