कोरोनाचा सर्वाधिक परिणाम ‘या’ क्षेत्रावर…२ कोटी नोकऱ्या गेल्या

95

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात निर्बंध लावले गेले होते. लॉकडाऊन काळात लोक घराबाहेर पडत नव्हते त्यामुळे प्रामुख्याने पर्यटन क्षेत्रावर परिणाम झाला. कोरोनाकाळात सन २०२० पासून पर्यटन क्षेत्राशी निगडित २ कोटी १५ लाख नागरिकांनी नोकऱ्या गमावल्या असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सोमवारी दिली.

लागोपाठ सुट्ट्या, सणवार आले की, हौशी पर्यटक विविध ठिकाणी सहलीला जातात. परंतु कोरोनाकाळात आंतरराष्ट्रीय पर्यटनासोबतच देशाअंतर्गत पर्यटनावरही निर्बंध असल्यामुळे पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेल्या अनेक लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. कोरोनाच्या पहिल्या लाटेत पर्यटकांचे प्रमाण ९३ टक्क्यांनी घटले. दुसऱ्या लाटेत हे प्रमाण ७९ टक्के तर तिसऱ्या लाटेत हे प्रमाण ६४ टक्क्यांनी घटल्याचे रेड्डी यांनी लोकसभेत सांगितले. या तिन्ही लाटांदरम्यान पर्यटन क्षेत्रावर गंभीर परिणाम झाला.

एवढ्या नागरिकांनी गमावल्या नोकऱ्या! केंद्रीय मंत्र्यांची माहिती

पहिली लाट- १ कोटी ४५ लाख
दुसरी लाट- ५० लाख २० हजार
तिसरी लाट- १ लाख ८ हजार

( हेही वाचा : बसमध्ये तुमचाही फोन हरवलाय? तर ही यादी वाचाच )

बिनव्याजी कर्ज देणार

आता हळूहळू पर्यटन क्षेत्र पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे त्यामुळे पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेल्यांना १० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे तर, पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या गाईडसाठी ही रक्कम १ लाख रुपये असेल असेही केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.