केरळ आणि देशाच्या इतर भागात कोरोना (Coronavirus) झपाट्याने पसरत आहे. गेल्या २४ तासात ४२३ नव्या रुग्णांची नोंद झाली. यादरम्यान चार रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे २६६ रुग्ण आढळले आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकात एका आणि राजस्थानमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
केरळ व्यतिरिक्त इतर राज्यांमध्येही नवीन कोरोना रुग्ण वाढले –
आरोग्य मंत्रालयाने शनिवारी (२३ डिसेंबर) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, केरळ व्यतिरिक्त इतर राज्यांमध्येही नवीन कोरोना रुग्ण वाढले आहेत. त्यापैकी २२ रुग्णांमध्ये (Coronavirus) नवीन प्रकार J N.1 असल्याची पुष्टी झाली आहे. कर्नाटकात ७०, महाराष्ट्रात १५, गुजरातमध्ये १२, गोव्यात ८, आंध्र प्रदेशात ८, तामिळनाडूमध्ये १३, उत्तर प्रदेशात ४, तेलंगणामध्ये ८ रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे – मुख्यमंत्री
देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन (Coronavirus) हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार २१ डिसेंबर रोजी आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
३३ हजार ऑक्सिजन बेड्स –
सध्या राज्यात ६३ हजार विलगीकरण बेड्स, ३३ हजार ऑक्सिजन बेड्स, (Coronavirus) ९ हजार ५०० आयसीयू बेड्स व सहा हजार व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. सध्या राज्यात कोरोनाचे ४५ रुग्ण (मुंब२७, पुणे-८, ठाणे-८,कोल्हापूर-१ रायगड-१) आढळून आले आहेत, असे म्हैसकर यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी जेएन वन या नव्या व्हेरिएंटबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येईल, असे सांगितले. (Coronavirus)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community