Coronavirus : भारतात २४ तासांत ५२९ कोरोना रुग्णांची नोंद, तीन जणांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाने याआधी देखील कोविडच्या संकटाचा धीरोदात्तपणे यशस्वी मुकाबला केला आहे. संपूर्ण जगाने त्याबाबतीत आपल्या देशाचे अनुकरण केले. मागील अनुभवाच्या आधारे आताही राज्यातील यंत्रणा संपूर्णपणे सज्ज आहे.

291
Coronavirus : भारतात २४ तासांत ५२९ कोरोना रुग्णांची नोंद, तीन जणांचा मृत्यू

केरळ आणि देशाच्या इतर भागात कोरोना (Coronavirus) झपाट्याने पसरत आहे. गेल्या २४ तासात ५२९ नव्या रुग्णांची नोंद झाली. यादरम्यान ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

(हेही वाचा – Winter Super Fruits : हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी खा ‘ही’ फळे)

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे (Coronavirus) ५२९ रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या भारतात एक्टिव्ह रुग्णांची संख्या ४०९३ झाली आहे. यादरम्यान कोरोनाचा सब व्हेरिएंट जेएन.१ च्या ४० नव्या प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. (Coronavirus)

(हेही वाचा – भजी विकली, लहानसहान कामे केली आणि असे घडले महा-उद्योगपती Dheerubhai Ambani)

नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे – मुख्यमंत्री

देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन (Coronavirus) हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार २१ डिसेंबर रोजी आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. (Coronavirus)

(हेही वाचा – Mumbai Police : मुंबईत नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांनी केल्या धडक कारवाया)

३३ हजार ऑक्सिजन बेड्स –

सध्या राज्यात ६३ हजार विलगीकरण बेड्स, ३३ हजार ऑक्सिजन बेड्स, (Coronavirus) ९ हजार ५०० आयसीयू बेड्स व सहा हजार व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. सध्या राज्यात कोरोनाचे ४५ रुग्ण (मुंब२७, पुणे-८, ठाणे-८,कोल्हापूर-१ रायगड-१) आढळून आले आहेत, असे म्हैसकर यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी जेएन वन या नव्या व्हेरिएंटबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येईल, असे सांगितले. (Coronavirus)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.