Coronavirus : भारतात २४ तासांत ७०२ कोरोना रुग्णांची नोंद, सहा जणांचा मृत्यू

देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार २१ डिसेंबर रोजी आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

325
Coronavirus : भारतात २४ तासांत ७०२ कोरोना रुग्णांची नोंद, सहा जणांचा मृत्यू

केरळ आणि देशाच्या इतर भागात कोरोना (Coronavirus) झपाट्याने पसरत आहे. गेल्या २४ तासात ७०२ नव्या रुग्णांची नोंद झाली. यादरम्यान ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

(हेही वाचा – Ram Mandir: राज्यभरात १८ ते २२ जानेवारीला राम मंदिर प्रतिष्ठापना उत्सव साजरा करणार)

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे (Coronavirus) ७०२ रुग्ण आढळून आले आहेत. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात दोघांचा तर कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि दिल्ली येथे एकाचा मृत्यू नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे सध्या भारतात एक्टिव्ह रुग्णांची संख्या ४०९७ झाली आहे. यादरम्यान संपूर्ण देशात कोरोनाचा सब व्हेरिएंट जेएन.१ च्या १०९ नव्या प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. (Coronavirus)

(हेही वाचा – Udayanaraje Bhosale: महापुरुषांची बदनामी रोखणारा कडक कायदा करा, उदयनराजेंची अमित शाहांकडे मागणी)

नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे – मुख्यमंत्री

देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन (Coronavirus) हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार २१ डिसेंबर रोजी आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. (Coronavirus)

(हेही वाचा –  CEO Chanda Kochhar: चंदा कोचर आणि इतर ९ जणांवर ‘टोमॅटो पेस्ट’ कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल)

३३ हजार ऑक्सिजन बेड्स –

सध्या राज्यात ६३ हजार विलगीकरण बेड्स, ३३ हजार ऑक्सिजन बेड्स, (Coronavirus) ९ हजार ५०० आयसीयू बेड्स व सहा हजार व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी जेएन वन या नव्या व्हेरिएंटबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येईल, असे सांगितले. (Coronavirus)

हेही पहा –  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.