Coronavirus JN1 variant : राज्यातील सिंधुदुर्गमध्ये आढळला जेएन १ चा पहिला रुग्ण

महाराष्ट्रात बुधवारी (२० डिसेंबर) कोविड-19 सब-व्हेरिएंट जेएन. 1 चा पहिला रुग्ण सिंधुदूर्ग येथे आढळला. देशाच्या काही भागात कोविड-19 प्रकाराची प्रकरणे वाढत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना चाचणी वाढविण्यास सांगितले. दरम्यान महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रिफ यांनी राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

404
Coronavirus JN1 Variant : ‘जेएन १’ आजाराबाबत घाबरु नका, पण काळजी घ्या
Coronavirus JN1 Variant : ‘जेएन १’ आजाराबाबत घाबरु नका, पण काळजी घ्या

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात जेएन १ व्हेरिएंटची (Coronavirus jn1 variant) एकूण २१ प्रकरणे आढळली आहेत. त्यातील सिंधुदुर्ग येथे एका ४१ वर्षीय व्यक्तीला जेएन १ ची लागण झाली आहे. जेएन १ व्हेरिएंटचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे.

भारतात गेल्या 24 तासात कोरोना साथरोगाच्या जेएन-1 (Coronavirus jn1 variant) या नव्या व्हेरियंटचे २१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. निती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी ही माहिती दिली.

(हेही वाचा – Ind vs SA 3rd ODI : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला हवी आघाडीच्या फळीकडून दमदार सुरूवात)

२४ तासांत देशात कोरोनाची ६१४ नवीन प्रकरणे

यासंदर्भात पॉल यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट जेएन-१ ची २१ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गोव्यात जेएन-१ प्रकाराची १९ प्रकरणे आणि महाराष्ट्र आणि केरळमध्ये प्रत्येकी १ (Coronavirus jn1 variant) रुग्ण आढळून आला आहे. तर गेल्या २४ तासांत देशात कोरोनाची ६१४ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी २४२ केरळमध्ये आहेत. या कालावधीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

राष्ट्रीय रिकव्हरी रेट ९८.८१ टक्के

आरोग्य मंत्रालयानुसार, २१ मे २०२३ रोजी म्हणजेच ७ महिन्यांनंतर एका दिवसात सर्वाधिक प्रकरणे नोंदवली (Coronavirus jn1 variant) गेली आहेत. मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात २३११ सक्रिय कोविड प्रकरणे आहेत. आतापर्यंत ५,३३,३२१ लोकांनी आपला जीव गमावला आहे. एकूण कोविड प्रकरणे ४.५० कोटी आहेत. तर कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४,४४,७०,३४६ कोटींवर पोहोचली आहे. राष्ट्रीय रिकव्हरी रेट ९८.८१ टक्के आहे. त्याच वेळी, मृत्यू दर १.१९ टक्के आहे. त्याच वेळी, देशातील कोविड लसीकरणाचा आलेख २२०.६७ कोटींवर पोहोचला आहे. केरळमध्ये कोरोनाचे २,०४१ सक्रिय रुग्ण आहेत. येथे, गेल्या ३ वर्षांत कोविडमुळे ७२,०५६ लोकांनी आपला जीव गमावला आहे.

(हेही वाचा – Maratha Reservation : गिरीश महाजन आणि इतर मंत्री जरांगे यांची भेट घेणार)

महाराष्ट्रात दररोज सुमारे ५०० चाचण्या सुरूच आहेत. दैनंदिन कोविड-19 रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यांना दैनंदिन चाचण्या वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. (Coronavirus jn1 variant)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.