Vande Bharat ट्रेन चालवण्यासाठी सरकारला किती खर्च येतो ?

85
Vande Bharat ट्रेन चालवण्यासाठी सरकारला किती खर्च येतो ?
Vande Bharat ट्रेन चालवण्यासाठी सरकारला किती खर्च येतो ?

देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन 2019 मध्ये चालवण्यात आली. वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील सर्वांत वेगवान ट्रेन मानली जाते. आतापर्यंत भारतात एकूण 136 वन्दे भारत एक्सप्रेस गाड्या रुळांवर धावत आहेत. वंदे भारत ट्रेनचा (Vande Bharat Train) कमाल वेग 160 किलोमीटर प्रति तास इतका आहे.

देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन वाराणसी ते नवी दिल्ली या मार्गावर धावली. आता भारताच्या जवळपास प्रत्येक राज्यात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवली जात आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवाशांना अनेक सुविधा मिळतात, ज्या सामान्य ट्रेनमध्ये मिळत नाहीत. भारतियांचे आकर्षण असलेली वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यासाठी भारत सरकार किती पैसे खर्च करते, याबद्दल जाणून घेऊया.

(हेही वाचा – Maharashtra Cabinet Expansion: महायुती सरकारमध्ये कोणते नवे चेहरे असणार?)

  • वंदे भारत ट्रेन मेक इन इंडिया अंतर्गत चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये ती तयार केली जाते. एक वंदे भारत ट्रेन तयार करण्यासाठी एकूण 130 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो.
  • वंदे भारत ट्रेन इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर धावते. ज्यामध्ये 1 किलोमीटर चालण्यासाठी अंदाजे 2000 ते 2500 रुपये खर्च येतो.
  • वंदे भारत ट्रेनने 500 किलोमीटरचा प्रवास केला, तर केवळ विजेचा खर्च 10 ते 12 लाख रुपयांपर्यंत आहे.
  • ट्रेन चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर आणि संपूर्ण व्यवस्थापनावर दरवर्षी सुमारे दोन-तीन कोटी रुपये खर्च होतात.
  • वंदे भारत ट्रेनच्या देखभालीवर दरवर्षी 10 ते 12 कोटी रुपये खर्च केले जातात. त्यामध्ये ट्रेनची साफसफाई, दुरुस्ती आणि तांत्रिक सुधारणा यांचा समावेश होतो.
  • वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीनंतर तिच्या संचालन आणि देखभालीवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होतात. कारण, ट्रेन प्रीमियम सुविधांनी सुसज्ज आहे. त्यामुळे सामान्य गाड्यांच्या तुलनेत यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात.

वंदे भारत ट्रेनच्या साधारणपणे 92 टक्के सीट्स बुक केल्या जातात, अशी माहिती समोर येते. त्यातून भारतीय रेल्वेला खूप चांगला महसूल मिळण्याची शक्यता आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.