Costal Road: मरिन ड्राइव्ह ते वरळी प्रवास होणार सुखकर, ४० मिनिटांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत कसा कराल ?

कोस्टल रोड प्रकल्पातील वरळी ते मरिन ड्राइव्ह हा नऊ किमीचा बोगदा १२ मार्च रोजी सुरू करण्यात आला आहे.

170
Costal Road: मरिन ड्राइव्ह ते वरळी प्रवास होणार सुखकर, ४० मिनिटांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत कसा कराल ?

मरिन ड्राइव्हहून वरळीपर्यंतचा ४० मिनिटांचा प्रवास अवघ्या ८ ते ९ मिनिटांत होणार आहे. संपूर्ण प्रकल्पावर सुमारे १४ हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पाचा दुसरा मोठा बोगदा सोमवारपासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला. (Costal Road)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या पाहणीनंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा मार्ग सोमवार ते शुक्रवार असे आठवड्याचे ५ दिवस सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी खुला राहणार आहे; तर कोस्टल रोडचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी शनिवारी व रविवारी हा मार्ग बंद ठेवणार आहे.

(हेही वाचा – Rohan Bopanna : रोहन बोपान्ना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दुहेरीत खेळणार)

मरिन ड्राइव्ह ते हाजी अलीपर्यंत ६.२५ किमीचा मार्ग सुरू
कोस्टल रोड प्रकल्पातील वरळी ते मरिन ड्राइव्ह हा नऊ किमीचा बोगदा १२ मार्च रोजी सुरू करण्यात आला आहे. आता मरिन ड्राइव्ह ते हाजी अलीपर्यंत ६.२५ किमीचा मार्गही सुरू झाला आहे. १०.५८ किमीचा कोस्टल रोड आणि ४.५ किमी लांबीचा वांद्रे-वरळी सी-लिंकला जोडणारे दोन्ही गर्डर बसविले आहेत. त्यामुळे लवकरच वांद्र्याहून-दक्षिण मुंबई असा पाऊण तासाचा प्रवास बारा मिनिटांत करता येणे शक्य आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.