Costal Roadवरील दुसरा बोगदा खुला होणार, कसा कराल प्रवास? वाचा सविस्तर

मुंबई महापालिकेच्या वतीने बांधण्यात येत असलेला धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) (कोस्टल रोड) प्रकल्पाचे ९० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले असून अंतिम टप्प्यातील कामे वेगाने केली जात आहेत.

244
Costal Roadवरील दुसरा बोगदा खुला होणार, कसा कराल प्रवास? वाचा सविस्तर

मरीन ड्राईव्हपासून सुरू होणारा दुसरा भूमिगत बोगदा उत्तर दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठी सुरू करण्यासाठी सोमवारी, (१० जून) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मार्गावर पाहणी करणार आहेत. त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाईल.

मुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यानंतर मंगळवार, (११ जून) सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत म्हणजे १६ तासांच्या कालावधीसाठी हा मार्ग वाहतुकीसाठी नियमित खुला होईल. दर आठवड्याला सोमवार ते शुक्रवार, असे पाच दिवस या मार्गावर वाहतूक सुरू राहील, शनिवारी आणि रविवारी आठवड्यातील २ दिवस प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्णत्वास नेणे सोयीचे व्हावे, यासाठी हा मार्ग बंद राहणार आहे.

(हेही वाचा – Bandra Terminus : वांद्रे टर्मिनस येथे कोणकोणत्या सुविधा तुम्हाला प्राप्त होऊ शकतात?)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, विविध लोकप्रतिनिधी, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अमित सैनी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

मुंबईकरांचा प्रवास जलद व अधिक सुखकर
मुंबई महापालिकेच्या वतीने बांधण्यात येत असलेला धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) (कोस्टल रोड) प्रकल्पाचे ९० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले असून अंतिम टप्प्यातील कामे वेगाने केली जात आहेत. प्रकल्पातील जो हिस्सा वाहतुकीसाठी वापरात आणणे शक्य आहे, तो उपलब्ध करून द्यावा, मुंबईकरांचा प्रवास जलद व अधिक सुखकर व्हावा, या हेतूने टप्प्याटप्प्याने मार्ग खुला करण्यात येत आहे. या मार्गात अमरसन्स उद्यान व हाजी अली येथील आंतरमार्गिकांचा वापर करता येणार आहे.

असा करा प्रवास…

– मरीन ड्राईव्ह येथून भूमिगत बोगदा मार्गाने प्रवेश केल्यानंतर अमरसन्स उद्यान आंतरमार्गिकेने बाहेर पडता येईल, तर अमरसन्स उद्यान आंतरमार्गिकेने प्रवेश केल्यानंतर दक्षिण बाजूस मरीन ड्राईव्हकडे, उत्तर बाजूस बॅरिस्टर रजनी पटेल चौक व वत्सलाबाई देसाई चौकाकडे जाता येईल.

– मरीन ड्राईव्ह येथून भूमिगत बोगदा मार्गाने प्रवेश केल्यानंतर हाजी अली येथील आंतरमार्गिकेवरून बॅरिस्टर रजनी पटेल चौक (लोटस जेटी परिसर) येथून पुढे वरळी, वांद्रेकडे मार्गक्रमण करता येईल.

– मरीन ड्राईव्ह येथून भूमिगत बोगदा मार्गाने प्रवेश केल्यानंतर हाजी अली येथील आंतरमार्गिकेवरून वत्सलाबाई देसाई चौक (हाजी अली चौक) येथून पुढे ताडदेव, महालक्ष्मी, पेडर रोडकडे मार्गक्रमण करता येईल.

– उत्तर दिशेला प्रवास करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी पुढील टप्प्यात बिंदूमाधव ठाकरे चौकापर्यंतचा किनारी रस्ता १० जुलै २०२४ पर्यंत सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्या दिशेने कामे सुरू आहे.

बोगद्याची वैशिष्ट्ये

  • मावळा या बोगदा खणणाऱ्या यंत्राच्या सहाय्याने, भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचा बोगदा (व्यास १२.१९ मी.) (अंतर्गत व्यास ११ मीटर)
  • दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे जुळा बोगदा.
  • भारतात प्रथमच रस्ते वाहतूक बोगद्यामध्ये सकार्डो वायूविजन प्रणाली.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये…

  • लांबी १०.५८ किमी मार्गिका ८ (४+४) (बोगद्यांमध्ये ३+३)
  • आंतरमार्गिका ३
  • आंतरमार्गिका लांबी १५.६६ किमी
  • भराव टाकून बनविलेला रस्ता ४.३५ किमी
  • पुलांची एकूण लांबी २.१९ किमी
  • बोगदा– दुहेरी २.०७ किमी
  • भूमिगत वाहनतळ ४
  • एकूण वाहन क्षमता १,८५६
  • एकूण भरावक्षेत्र १११ हेक्टर
  • खुली/हरित जागा ७० हेक्टर
  • सागरी संरक्षण भिंती/पदपथ ७.४७ किमी
  • विहार क्षेत्र (प्रोमीनेड) ७.५० किमी
  • प्रकल्पाचा खर्च अंदाजित रुपये १३,९८३ कोटी
  • बांधकाम खर्च रुपये ८,४२९ कोटी
  • कामाची सुरुवात १३ ऑक्टोबर २०१८
  • पूर्णत्वाचे नियोजन ऑक्टोबर २०२४

प्रकल्पाचे फायदे

  • ७० टक्के वेळेची बचत होणार
  • ३४ टक्के इंधन बचत होणार
  • ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण कमी होण्यास मदत
  • बससाठी स्वतंत्र मार्गिका
  • भारतामध्ये प्रथमच एकलस्तंभ (मोनोपाईल) बांधून पुलांची उभारणी
  • काच प्रकल्पामध्ये पुनःप्रापण करून रस्ता, पूल, उन्नत मार्ग, उतरण मार्ग, आच्छादित बोगदा, समुद्र तसेच टेकडीखालून बोगदा, हरितक्षेत्राची निर्मिती

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.