coastal road: कोस्टल रोड कधी पर्यंत होणार पूर्ण? प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती… 

कोस्टल रोड प्रकल्पाचे काम 74.33 टक्के पूर्ण झाले आहे.

231
कोस्टल रोडची कधी पर्यंत होणार पूर्ण
कोस्टल रोडची कधी पर्यंत होणार पूर्ण

मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते वांद्रे-वरळी सी लिंक हा कोस्टल रोडचा दक्षिण भाग जून 2024 पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न आहे. मरिन ड्राईव्ह ते वरळी दरम्यानच्या दक्षिण कोस्टल रोडचे काम नोव्हेंबर 2023 पर्यत पूर्ण होणार आहे. वरळी ते वांद्रे-वरळी सी लिंक इंटर कनेक्टसाठी पाच ते सहा महिने अधिकचा वेळ लागणार आहे. शिवाय वरळी समुद्रातील एक खांब कमी केल्याने 611 कोटीचा अधिकचा खर्च वाढणार आहे, कोस्टल रोड प्रकल्पाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर चंद्रकांत कदम यांनी ही माहिती दिली.

कोस्टल रोड प्रकल्पाचे काम 74.33 टक्के पूर्ण झाले आहे. कोस्टल रोड प्रकल्पातील एका बोगद्याचे काम याआधीच पूर्ण झाले आहे तर टनेल बोरिंग मशीनच्या बिघाडानंतर सुद्धा दुसऱ्या बोगद्याचे काम आता दोन टक्के बाकी आहे. पहिल्या बोगदाचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या बोगदाचे काम 22 ते 25 मे दरम्यान पूर्ण होणार आहे. नोव्हेंबर 2023 ची डेडलाईनची याआधी दिली होती. हे काम पूर्ण होण्यासाठी ती डेडलाईन तशाच प्रकारे असेल. मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतचे काम नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. तर वरळीपासून पुढे हा कोस्टल रोड-वांद्रे वरळी सी लिंकला जोडण्यासाठी अधिकचा वेळ लागणार आहे. वरळीच्या समुद्रामध्ये एक खांब कमी केल्याने पूर्ण हा कोस्टल रोड वरळी वांद्रे सी लिंकला जोडण्यासाठी पाच ते सहा महिने अधिकचे लागणार आहेत. वरळीच्या भरावाचे काम नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल तिथून सी लिंकपर्यंतचे काम मे 2024 पर्यंत पूर्ण होईल. कोस्टल रोडचा वरळीच्या समुद्रातील 1 खांब कमी केल्याने दोन खांबांमध्ये 120 मीटरचे अंतर असणार आहे. त्यामुळे कोस्टल रोडचा खर्च 611 कोटींनी वाढणार आहे. दक्षिण कोस्टल रोड प्रकल्पासाठी 12721 कोटी रुपये खर्च होणार आहेत आणि त्यात 611 कोटींची वाढ होणार आहे. जून 2024 पर्यंत दक्षिण कोस्टल रोड हा वाहतुकीसाठी खुला करण्याचा पूर्णपणे प्रयत्न असेल. मे पर्यंत कोस्टल रोड वरळी सी लिंकला जोडण्याचा प्रयत्न असेल आणि त्यानंतर जूनपर्यंत वाहतूक या कोस्टल रोडवरुन सुरु करण्याचा प्रयत्न आहे.

(हेही वाचा उत्तुंग इमारतीतील आगीवर कम्प्रेस्ड एअर फोम सिस्टीमसह हाय प्रेशर वॉटर मिस्टचा उतारा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.