मुंबई मध्ये प्रवास करताना अनेक वेळा वाद विवादाचे प्रसंग उपस्थित होतात तसेच प्रवासादरम्यान जाणवलेल्या सुरक्षेच्या समस्या मुंबई रेल्वे पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदारांना आपल्याच मैत्रिणी असल्याचं समजून व्यक्त करण्याचे आवाहन या मोहिमेद्वारे करण्यात आले आहे. खाकीतील सखी या अनोख्या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी केवळ महिलांसाठी तयार केलेले आणि सामाजिक समुदाय व्यासपीठ असलेले कोटो अॅप हे आता मुंबई रेल्वे पोलिसांबरोबर संयुक्तरीत्या काम करणार आहे. मुंबई रेल्वे पोलिस दलातील महिला अंमलदार यांना महिला रेल्वे प्रवाशांनी त्यांच्या ‘सखी’ असे गृहीत धरून लोकल ट्रेनमधून प्रवास करताना त्यांच्या सुरक्षेसंबंधीत भेडसवणारे प्रश्न, अनुचित, अप्रिय अनुभव या बाबत रेल्वे पोलीसांकडे व्यक्त होणे हा मुख्य उद्देश आहे. (Mumbai Police)
या उपक्रमाचा भाग म्हणून शहरातील महिलांना रेल्वे प्रवाशांचे मुंबई रेल्वे पोलिसांच्या महिला अंमलदार यांचे समवेत मुक्त आणि सुरक्षित अभिवचन प्रस्थापित व्हावे यासाठी कोटो महिला सुरक्षा समुदाय, खाकीतील सखी या उपक्रमाला पाठिंबा देणार आहे. महिला प्रवासी त्यांच्या लोकल प्रवासादरम्यान येणाऱ्या कोणत्याही समस्यांची तक्रार करण्यासाठी कोटो समुदाय अॅप वापरू शकतात. ते त्यांच्या समस्यांबद्दल फोटो, व्हिडिओ आणि संदेश पोस्ट करू शकतात आणि रेल्वे पोलिस त्याप्रमाणे त्वरित कारवाई त्यांना संबोधित करतील.हा उपक्रम म्हणजे मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना महिलांच्या सुरक्षेसाठी आमच्या सततच्या प्रयत्नांचा विस्तार आहे.
(हेही वाचा : Israel-Hamas Conflict : गाझामधील रुग्णालयावरील हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही धक्का)
कोटोच्या सह-संस्थापक अपर्णा आचरेकर यांनी आपले विचार मांडताना सांगितले, “कोटो महिलांना कोणताही संकोच किंवा डिजिटल ट्रोलिंगशिवाय स्वतःला व्यक्त करण्यासाठी सुरक्षित वातावरण प्रदान करण्याची कल्पना करते. हा उपक्रम शहरातील महिलांमध्ये विश्वासाची भावना वाढवतो, ज्यांना मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना सुरक्षेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते, त्यांच्या समस्या त्यांनी मुंबई रेल्वे पोलिस महिला अंमलदारांना सांगाव्यात. महिलांना मुंबई रेल्वे पोलिस महिला अंमलदारांना त्यांची मैत्रीण किंवा त्यांच्या खाकीतील सखी म्हणून पाहण्यासाठी प्रोत्साहित करते. हा उपक्रम महिला सुरक्षेसाठी मुंबई रेल्वे पोलिसांच्या प्रयत्नांना सामुदायिक भागीदार म्हणून एक पाऊल पुढे टाकत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community