कॉटन ग्रीन स्कायवॉक ते कॉटन ग्रीन स्थानकापर्यंत जोडणारे पादचारी पूल बांधले जाणार असून एकप्रकारे रेल्वे स्थानक ते स्कायवॉक याची कनेक्टीव्ही जोडली जाणार आहे. त्यामुळे या रेल्वे स्थानक आणि स्कायवॉक जोडणारे पादचारी पूल बांधण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि रहिवाशांच्या मागणीचा विचार करत प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. (Cotton Green Railway Station)
कॉटन ग्रीन शेजारी असलेले स्कायवॉक हे रेल्वे स्थानकाला जोडलेले नसल्याने रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी रहिवाशांकडून वारंवार महापालिकेकडे तक्रार केली जात होती. या तक्रारीची दखल घेत महापालिकेने आता रेल्वे स्थानक ते स्कायवॉकची कनेक्टीव्हीटी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जून २०२३ निविदा मागवण्यात आली. या निविदेमध्ये एसव्हीजे एनोव्हाबिल्ड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली आहे. (Cotton Green Railway Station)
(हेही वाचा – MITRA SHAKTI – 2023 : औंध येथे भारत-श्रीलंकेच्या संयुक्त लष्करी सरावाला सुरुवात)
या पादचारी पुलाच्या बांधकामासाठी विविध करांसह ४ कोटी २१ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. या पुलाची लांबी ५० मीटर एवढी असून दोन स्पॅनमध्ये हे पूल बांधले जाणार आहे. तर पुलाची रुंदी ही अडीच मीटर एवढी आहे.हे सर्व बांधकाम आरसीसीचे राहणार आहे. तर यासाठी टीपीएफ इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेडची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. (Cotton Green Railway Station)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community