चंद्रयान-३ सॉफ्ट लँडिंगसाठी काही अवधीचं शिल्लक राहिला आहे. सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचलेली असतानाच इस्रोमध्ये काऊंटडाऊन सुरू झाले असून इस्रोने काही फोटो शेअर केले आहेत. त्यानुसार, चंद्रयान-३ साठी इस्रोमध्ये (ISRO) काय वातावरण आहे हे स्पष्ट होत आहे. पुढच्या काही तासांत भारत एक ऐतिहासिक क्षण अनुभवणार आहे.
भारताच्या चंद्रयान मोहिमेकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष आहे. आज २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रयानाचे विक्रम हे लँडर चंद्रपृष्ठावर उतरणार आहे. रशियानेही लूना-२५ या मोहिमेच्या माध्यमातून चंद्रपृष्ठावर उतरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ऐन वेळी रशियाच्या या यानात तांत्रिक बिघाड झाला आणि ते चंद्रपृष्ठावर कोसळले. असे असताना भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी होण्याकरता भारतीय वैज्ञानिकांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
(हेही वाचा : Varun Industries : सार्वजनिक क्षेत्रातील २ बँकांची 388 कोटींची फसवणूक)
चंद्रयान २ अपयशी ठरल्यानंतर चंद्रयान-३ साठी इस्रोच्या वैज्ञानिकांनी सर्वतोपरी प्रयत्न केल्यानंतर आता तो ऐतिहासिक क्षण अगदी जवळ येऊन ठेपलाय. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्वच जण आतुर झाले असून इस्रोमध्ये काऊंटडाऊन सुरू झाले असून इस्रोने काही फोटो शेअर केले आहेत. त्यानुसार, चंद्रयान-३ साठी इस्रोमध्ये काय वातावरण आहे हे स्पष्ट होत आहे.
इस्रोतील वैज्ञानिक, अधिकारी आजच्या लँडिंगसाठी सज्ज
दरम्यान, इस्रोने काही फोट शेअर केले आहेत, त्यात इस्रोतील वैज्ञानिक, अधिकारी आजच्या लँडिंगसाठी सज्ज असल्याचे दिसत आहे. इस्रोने केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “ऑटोमॅटिक लँडिंग सिक्वेन्स (ALS) सुरू करण्यासाठी सर्व सज्ज आहेत. ठरलेल्या जागेवर लँडर मॉड्यूल (LM) च्या आगमनाची प्रतीक्षा सुरू आहे, सुमारे ५ वाजून ४४ वाजता ALS कमांड मिळाल्यावर, LM पॉवर्ड डिसेंटसाठी थ्रोटल करण्यायोग्य इंजिन सक्रिय करण्यात येईल. मिशन ऑपरेशन्स टीम कमांड्सकडून अनुक्रमिक माहिती दिली जाईल. MOX वर ऑपरेशन्सचे थेट प्रक्षेपण ५ वाजून २० मिनिटांनी सुरू होईल. ”१४ जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चंद्रावरील भारताची तिसरी मोहीम यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आली. काही आठवड्यांनंतर, ५ ऑगस्ट रोजी लँडरने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता आणि आता चांद्रयान ३ लँडिंगसाठी सज्ज झाले आहे. चांद्रयान मोहिमेचं लाइव्ह टेलिकास्ट संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटांनी सुरु होईल. युट्यूब चॅनल आणि डीडीवरही हे टेलिकास्ट दाखवण्यात येणार आहे. संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यात यशस्वी ठरेल असाही विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
हेही पहा :
Join Our WhatsApp CommunityChandrayaan-3 Mission:
All set to initiate the Automatic Landing Sequence (ALS).
Awaiting the arrival of Lander Module (LM) at the designated point, around 17:44 Hrs. IST.Upon receiving the ALS command, the LM activates the throttleable engines for powered descent.
The… pic.twitter.com/x59DskcKUV— ISRO (@isro) August 23, 2023