सिग्नल काउंटडाऊनमुळे नवी मुंबईत झाला गोंधळ! वाचा

155

वाहतूक कोंडी, रस्ते अपघात टाळण्यासाठी अलिकडे प्रत्येक सिग्नलवर काउंटडाऊन टाइमर लावण्यात आले आहेत. यामुळे सिग्नल केव्हा सुटणार, किती वेळ बाकी याचा अंदाज मिळतो. पण याच सिग्नल काउंटडाऊन टाइमरमुळे नवी मुंबईत गोंधळ निर्माण झाला आहे. जवळपास आठवडाभरआधी या सिग्नलवर मराठीमधून काउंटडाऊन क्रमांक दाखवल्यानंतर एपीएमसी मार्केटमधील ट्रॅफिक सिग्नल पुन्हा इंग्रजी आकडे दाखवू लागले आहेत.

वाहनधारकांचा गोंधळ उडाला

एपीएमसी मार्केटमधील काही ट्रॅफिक सिग्नल्सचे काउंटडाऊन टाइमर मराठीत नंबर दाखवत होते. त्यामुळे अनेकांना मराठी क्रमांक समजत नसल्याने वाहनधारकांचा गोंधळ उडाला होता. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केवळ तांत्रिक चाचणीसाठी हा बदल केला असल्याचे स्पष्ट केले आहे. भाषा इंग्रजीतून मराठीत बदलण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. सॉफ्टवेअरमधील काही समस्यांमुळे असे घडले आणि आम्ही या आठवड्याच्या सुरुवातीला त्याचे निराकरण केले. आता शहरातील सर्व ट्रॅफिक सिग्नल्स इंग्रजीमध्ये काउंटडाऊन क्रमांक प्रदर्शित करत आहेत. असेही त्यांनी सांगितले.

( हेही वाचा : परीक्षा घोटाळ्यावरील चर्चेची फडणवीसांची मागणी, काँग्रेसने दिला पाठिंबा )

इंग्रजी क्रमांक फायदेशीर

वाहनचालकांना मराठी क्रमांक समजून घेण्यास अडचण होते. ज्या लोकांना मराठी येत नाही असा सर्वांना इंग्रजी क्रमांक समजून घेणे अधिक सोयीचे जाते असे मत स्थानिक लोकांनी व्यक्त केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.