बापरे! रुग्णालयांत इंजेक्शन देण्यासाठी सुईच मिळणार नाही

132

देशातील लसीकरण मोहिमेच्या गतीवर, विशेषत: दिल्ली एनसीआरमध्ये आगामी काळात परिणाम होऊ शकतो. दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील फरिदाबाद येथे देशातील सर्वात मोठी सिरिंज बनवणाऱ्या हिंदुस्थान सिरिंज अँड मेडिकल डिव्हाइसेस (एचएमडी) च्या तीन कारखान्यांना टाळे ठोकण्यात आले आहे. या कारखान्यात दररोज 15 दशलक्ष सुया आणि 80 लाख सिरिंजचे उत्पादन होते, मात्र आता ते बंद झाले आहे. त्यामुळे भारतात सुई आणि सिरिंजची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

लसीकरकणावर होऊ शकतो परिणाम

मेडिकल डिव्हायसेस लिमिटेडच्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले, “सुई आणि सिरिंज निर्माते बंद केल्याने एनसीआरमधील आरोग्य सेवा वितरणावर आणि विशेषतः कोविड 19 लसीकरणावर परिणाम होऊ शकतो. “फरीदाबादमधील आमच्या सुई आणि सिरिंजच्या कारखान्यांसह इतर अनेक कंपन्यांच्या कारखान्यांना बंद करण्यास सांगितले आहे. असे एचएमडीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव नाथ यांनी सांगितले.

म्हणून बंद करण्यात आले कारखाने

भारतातील उपशामक आरोग्य सेवा आणि लसीकरणासाठी 66 टक्क्यांहून अधिक सिरिंज पुरवठ्यामध्ये एचएमडीचे योगदान आहे. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी सिरिंज उत्पादन सुविधांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत राष्ट्रीय महत्त्वाचे उत्पादन म्हणून घोषित करण्याची विनंती केली आहे. फरिदाबादमध्ये वाढत्या प्रदूषणामुळे हरियाणा प्रदूषण नियंत्रण मंडळाने २२८ युनिट्स बंद करण्याचे निर्देश दिले असल्याचे स्पष्ट झाले आहे. एचएमडीचे म्हणणे आहे की त्यांच्या सर्वात मोठ्या प्लांटमध्ये वीज कपात झाल्यास, पीएनजीवर चालण्याची व्यवस्था आहे आणि आता डिझेलचा वापर देखील कमी होत आहे.

 ( हेही वाचा: बापरे! महापौर पदासाठी ‘या’ पक्षाने प्रत्येक नगरसेवकाला दिले होते ३५ लाख )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.