शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी प्रकरणात उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना न्यायालयाने दणका दिला आहे. त्यांनी केलेला दोषमुक्तीचा अर्ज लोकप्रतिनिधींसाठीच्या विशेष सत्र न्यायालयाने सोमवार, २३ सप्टेंबर रोजी फेटाळला. प्रकरण खटला चालवण्यासाठी पुन्हा माझगाव दंडाधिकाऱ्यांकडे पाठवले. विशेष सत्र न्यायालयाच्या या निर्णयामुळे, ठाकरे आणि राऊत यांना आता मानहानीच्या खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.
(हेही वाचा – दहशतवाद हा जागतिक शांततेसाठी गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरून PM Narendra Modi यांचा इशारा)
ठाकरे आणि राऊत यांनी आरोप मान्य नसल्याचे यापूर्वीच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाला सांगितले होते. त्यानंतर महानगरदंडाधिकाऱ्यांनी दोघांना जामीन मंजूर केला होता. या प्रकरणी पुन्हा झालेल्या सुनावणीच्या वेळी, ठाकरे आणि राऊत यांनी दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता. तत्कालिन खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्यातर्फे या मागणीला विरोध करण्यात आला होता. युक्तिवाद ऐकल्यानंतर महानगरदंडाधिकाऱ्यांनी ठाकरे आणि राऊत यांचा दोषमुक्तीच्या अर्ज फेटाळला होता.
या निर्णयाविरोधात दोघांनी विशेष सत्र न्यायालयात धाव घेऊन दोषमुक्तीची मागणी केली होती. महानगरदंडाधिकाऱ्यांनी निर्णय देण्यात चूक केल्याचा दावा केला होता. विशेष न्यायालयाने सोमवारी या प्रकरणी निर्णय देताना ठाकरे (Uddhav Thackeray) व राऊत यांना दोषमुक्त करण्यास नकार दिला व प्रकरण पुन्हा महानगरदंडाधिकाऱ्यांकडे पाठवले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community