सुनील मानेची न्यायालयीन कोठडीत रवानगी!

मानेच्या वकिलांनी माने याला तुरुंगात सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने सुरक्षा देण्याचे तोंडीच आदेश दिले आहे.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या निलंबित पोलिस निरीक्षक सुनील माने याची एनआयए कोठडी शनिवारी संपली असून न्यायालयाने त्याला १३ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान माने याच्या वकिलांनी न्यायालयात माने यांना तुरुंगात सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी केली होती. न्यायालयाने सुरक्षेचे तोंडी आदेश दिले आहे.

मानेला सुरक्षा देण्याचे तोंडी आदेश!

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने मुंबई पोलिस दलातील निलंबित पोलिस निरीक्षक सुनील माने याला अटक केली होती. सुनील माने याची शनिवारी एनआयए कोठडी संपली होती. न्यायालयाने सुनील माने याच्या एनआयए कोठडीत वाढ न करता १३ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान मानेच्या वकिलांनी माने याला तुरुंगात सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने सुरक्षा देण्याचे तोंडीच आदेश दिले आहे. सुनील माने याची रवानगी तळोजा तुरुंगात करण्यात आली असून त्यांना गंभीर गुन्ह्यातील कैद्यासोबत ठेवण्यात येणार नसल्याचे समजते. सचिन वाझे, एपीआय रियाजुद्दीन काझी हे देखील तळोजा तुरुंगातच न्यायबंदी आहेत.

(हेही वाचा : एसीबी करणार सचिन वाझेच्या संपत्तीची चौकशी?)

सुनील माने याचा हिरेन प्रकरणात सहभाग!

मुंबई गुन्हे शाखेच्या कांदिवली युनिटमध्ये प्रभारी पोलिस निरीक्षक असताना, सुनील माने याने मनसुख हिरेनच्या हत्येसाठी सचिन वाझेला मदत केल्याचे समोर आले आहे. मनसुखला हत्येच्या दिवशी तावडे नावाने फोन करुन, घोडबंदर रोड वरील गायमुख वाडी येथे सुनील माने यानेच भेटायला बोलावले होते. त्याआधी सुनील माने हा खाजगी पोलो वाहनातून कळवा रेल्वे स्थानक येथे, सचिन वाझेला घेण्यासाठी गेला होता. कांदिवली युनिट मधून निघण्यापूर्वी माने याने आपला मोबाईल फोन स्विच ऑफ करुन कार्यालयात ठेवून दिला असल्याचे, एनआयएच्या तपासात समोर आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here