अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी राष्ट्राध्यक्षाची सूत्रे हाती घेताच कठोर निर्णय घेतले आहेत. यापैकी एक म्हणजे देशात जन्मजात नागरिकत्व (Citizenship) रद्द करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे ट्रम्प यांच्या या आदेशाला आता अमेरिकेच्या फेडरल जिल्हा न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
(हेही वाचा – Thane : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीप्रीत्यर्थ ठाणे येथे व्यंगचित्रकला स्पर्धा; महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद)
डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच जन्माच्या आधार नागरिकत्व प्रदान करण्याची प्रक्रिया बंद करण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांच्या नागरिकत्वाच्या निर्णयाविरोधात डेमोक्रॅटच्या नेतृत्वाखालील चार राज्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यावर सुनावणी करताना अमेरिकेचे फेडरल जिल्हा न्यायाधीश जॉन कॉफनर यांनी या आदेशाला स्थगिती दिली.तसेच, “माझ्या 40 वर्षांच्या न्यायालयीन कारकिर्दीत, मी कधीही संविधानाच्या पूर्णपणे विरोधात असलेला एवढा स्पष्ट खटला पाहिलेला नाही, असेही यावेळी बोलताना न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश पूर्णपणे असंवैधानिक असल्याचे स्पष्ट केले. सोबतच, या निर्णयाला 14 दिवसांचा तात्पुरती स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 फेब्रुवारीला होणार आहे.
ट्रम्प (Donald Trump) यांनी राष्ट्राध्यक्ष होताच पहिल्याच दिवशी जन्माच्या आधारावरील नागरिकत्वाची तरतूद काढून टाकण्याच्या आदेशावर सही केली आहे. नवीन निर्णयानुसार, मुलांच्या पालकांपैकी एक जण अमेरिकन नागरिक, ग्रीन कार्डधारक किंवा अमेरिकन सैन्याचा सदस्य असेल तरच नागरिकत्व मिळेल. बेकायदेशीर स्थलांतरित आणि बर्थ टूरिझम रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र, अमेरिकेच्या फेडरल जिल्हा न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community