कोरोना प्रतिबंधात्मक कोवॅक्सीन लसीचाचा बूस्टर डोस ओमिक्रॉनसह कोरोनाच्या इतर प्रकारांविरूद्ध खूप प्रभावी आहे. आयसीएमआर आणि भारत बायोटेकच्या संयुक्त अभ्यासात ही बाब समोर आली आहे. अभ्यासात असे आढळून आले की कोवॅक्सिनच्या बूस्टर डोसने दोन-डोस प्राथमिक लसीकरणानंतर 6 महिन्यांनी चांगल्या एंटीबॉडीज विकसित केल्या आहेत.
51 रुग्णांवर अभ्यास करुन निष्कर्ष काढण्यात आला
यासंदर्भात इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) मधील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रज्ञा यादव म्हणाल्या की, सुमारे 30 म्युटेशननंतर ओमिक्रॉनच्या उदयामुळे ही लस कुचकामी ठरू शकते अशी चिंता निर्माण झाली होती. तसेच, इतर मान्यता प्राप्त लसी विषाणूच्या उदयोन्मुख रूपांविरुद्ध फारशा प्रभावी दिसून येत नाही. अँटीबॉडी प्रतिसाद कमी झाल्याच्या अहवालामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सुमारे 51 रुग्णांवर अभ्यास करून निष्कर्ष काढण्यात आला. त्यानुसार ज्यांना 6 महिन्यांपूर्वी कोवॅक्सीनचे दोन्ही डोस मिळाले होते. त्यांचा लसीचा तिसरा डोस किंवा बूस्टर शॉट दिल्यानंतर 28 दिवसांपर्यंत याचा अभ्यास करण्यात आला. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि कोवॅक्सीन निर्माता भारत बायोटेक यांनी जानेवारीमध्ये हा अभ्यास केला होता, ज्याचे निष्कर्ष 24 मार्च रोजी जर्नल ऑफ ट्रॅव्हल मेडिसिनमध्ये प्रकाशित झाले.
( हेही वाचा: सदावर्तेंना दोन दिवसांची पोलिस कोठडी, किल्ला न्यायालयाचा निर्णय )
कोवॅक्सिन प्रभावी
एनआयव्हीमधील आणखी एक ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सकपाळ म्हणाले की, बी-1 आणि व्हीओसीएश- डेल्टा, बीटा आणि ओमिक्रॉन प्रकारांविरुद्ध बूस्टर डोसमुळे अँटीबॉडीजचा विकास चांगला झाल्याचे आढळून आले. यावरून असे लक्षात आले की कोवॅक्सिनच्या बूस्टर डोसने अँटीबॉडी प्रतिसादांना तटस्थपणे चालना दिली आणि SARS-CoV-2 चे अनेक प्रकार सहजगत्या निष्प्रभ केले.
Join Our WhatsApp Community