कामाठी पुरातील देहविक्री करणाऱ्या महिलांनाही कोविडचे संरक्षण

118

दक्षिण मुंबईतील कामाठी पुरा हा रेड लाईट एरिया म्हणून ओळखला जातो. कोविड काळातील लॉकडाऊनमध्ये देह विक्री करणाऱ्या महिलांचे प्रचंड हाल होते. सरकार आणि महापालिकेच्यावतीने स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून या वंचित घटकाला मदत करण्याचे काम करण्यात आले होते. परंतु आता त्यांना कोविडपासून बचाव करण्यासाठीचेही लसीकरण करण्यात आले असून सोमवारी कामाठीपुरा येथील रेड लाईट एरियातील तब्बल १३२ देहविक्री करणाऱ्या महिलांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यामुळे रेड लाईट एरियातील या महिलांना कोविडचे संरक्षण लाभले आहे.

लसीचा दुसरा डोस

मुंबई महानगरपालिकेच्या यांच्या सहकार्याने कोविड -१९  लसीचा दुसरा डोस मुंबईतील कामाठीपुरा, रेड लाईट क्षेत्रात यशस्वीपणे पार पडले. ‘अपने आप वूमन’स कलेक्टिव्ह (एए डब्लयूसी) गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ रेड-लाइट भागात काम करत असलेली तस्करीविरोधी संघटना आहे आणि मुली आणि महिलांच्या पुनर्वसन-कार्य काम करते. महिला लाभार्थी, बीएमसी ई-विभाग आणि अपने आप विमेन्स कलेक्टिव्ह यांच्या सहकार्याने आणि समन्वयाने हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले.

महिलांची गरज ओळखून लसीकरण

कामाठीपुरातील रेड लाईट क्षेत्रातील देहविक्री करणाऱ्या महिलांची कोविड १९च्या लसीकरणाचे गरज लक्षात घेऊन ‘ई’ विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ शैलेंद्र गुज्जर यांनी शनिवार २२ ऑक्टोबर रोजी ‘अपने आप वूमेन्स कलेक्टिव्ह’च्या सीईओ मंजू व्यास आणि  फिल्ड डायरेक्टर पूनम अवस्थी यांची बैठक बोलावून त्यांच्याशी संवाद साधला. या बैठकीला डॉ.शैलेश पोळ, डॉ.दर्शन पाटील, डॉ.इबाद सय्यद हे उपस्थित होते. डॉ. दर्शन पाटील यांनी पुढाकार घेवुन दुसऱ्या लसीकरणासाठी अथक प्रयत्न केले.

(हेही वाचा -एसटी कर्मचाऱ्यांना खुशखबर! दिवाळीपूर्वी होणार ऑक्टोबरचा पगार)

१३२ महिलांनी घेतला लाभ

रेड-लाईट क्षेत्रातील बहुसंख्य वेश्याव्यवसायात काम करणाऱ्या महिला लाभार्थ्यांना ‘एएडब्ल्यूसी’ द्वारे कोविड -१९ लसीकरणाच्या पहिल्या डोसची आधीच सेवा देण्यात आली होती आणि ठरल्याप्रमाणे २५ ऑक्टोबर रोजी दुसऱ्या डोसचे लसीकरण शिबीर कामाठीपुरा येथील ११व्या गल्लीत पार पडले. डॉ शैलेश पोळ, डॉ. दर्शना पाटील, डॉ इबाद, डॉ मारिया यांच्यासह ७  महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते. एएडब्ल्युसी आउटरीच टीमने परिश्रमपूर्वक स्थापित केलेल्या ताळमेळामुळे शिबीरमध्ये १३२ लाभार्थ्यांना कोविड-१९ लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.