पुणे सलग दुस-या दिवशी हादरले! बीए व्हेरिएंटचा फैलाव वाढला

पुण्यात जुलै महिन्यातही बीए व्हेरिएंटचे रुग्ण सापडत असल्याचे बी जे वैद्यकीय रुग्णालयाच्या अहवालातून उघडकीस आले आहे. २५ जून ते ४ जुलैदरम्यान कोरोनाची लागण झालेल्या ३५ रुग्णांमध्ये बीए व्हेरिएंट आढळून आला. बीए ४ आणि ५ चे १८ तर बीए २.७५ व्हेरिएंटचे १७ रुग्ण पुण्यात सापडल्याचे आरोग्य विभागाने रविवारी जाहीर केले. राज्यात पुणे हे बीए व्हेरिएंटचे हॉटस्पॉट ठरत असल्याचे सलग दुस-या दिवशी आढळून आले.

राज्यात बीए व्हेरिएंटचे इतके रुग्ण

पुण्यात आतापर्यंत बीए ४ आणि ५ व्हेरिएंटचे ८४ तर बीए २.७५ व्हेरिएंटचे ३७ रुग्ण सापडले आहेत. राज्यातील इतर भागांत मुंबईत बीए ४ आणि ५ व्हेरिएंटचे ३३, नागूपर, ठाणे आणि पालघरात प्रत्येकी ४, रायगडात ३ रुग्ण सापडल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. तर बीए २.७५ व्हेरिएंटचे नागपूरात १४, अकोल्यात ४, ठाणे आणि यवतमाळमध्ये आतापर्यंत एक रुग्ण सापडला आहे.

डिस्चार्ज रुग्णांच्या संख्येत घट

बीए व्हेरिएंट वाढल्यानंतर ब-याच काळानंतर रविवारी पहिल्यांदाच नव्या रुग्णांची संख्या डिस्चार्ज रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत जास्त होती. रविवारी २ हजार १८६ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले, तर २ हजार १७९ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज दिला गेला.

३ कोरोनाबाधितांचा मृत्यू

राज्यात मुंबईत दोन कोरोना रुग्णांनी उपचारादरम्यान आपला जीव गमावला. चंद्रपूर जिल्ह्यातही एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here