राज्यात कोरोनाचा विस्फोट! एकाच दिवशी १४,३१७ नवीन रुग्ण संख्या!! 

मागील २ आठवड्यांपासून महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या नियंत्रणाबाहेर गेल्याने तिथे लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी, १० मार्च रोजी राज्यातील नवीन कोरोना रुग्ण संख्या १३ हजार ६५९ इतकी वाढली होती, तर गुरुवारी, ११ मार्च रोजी १४ हजार ६५९ नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यात चिंता वाढली आहे. सरकार आता याविषयावर कडक निर्णय घेण्याच्या विचारात आहे.

आजपर्यंत राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही २१,०६,४०० पर्यंत पोहचली आहे, तर गुरुवारी, ११ मार्च रोजी ७,१९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपूरमध्ये सर्वाधिक १,७०१ इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्या खालोखाल पुणे येथे १ हजार ५१४, मुंबई महापालिका क्षेत्रात १ हजार ५०९ इतकी नवीन रुग्ण संख्या नोंद झाली आहे.

नागपुरात पूर्ण लॉकडाऊन!

महाराष्ट्रात कोरोनाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रादुर्भावामुळे राज्यातील एकामागोमाग एक जिल्ह्यात लॉकडाऊन लावणे सुरु केले आहे. नागपुरात १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. भाजीपाला, फळ दुकाने, दूध यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने मात्र सुरूच राहतील. यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक भागांमध्ये लॉकडाउन लावण्याचा इशारा दिला आहे.

(हेही वाचा : यंदा कोकणात शिमग्याला पालख्या घरोघरी येणार नाहीत! )

महाराष्ट्रात १ लाख ऍक्टिव्ह रुग्ण! 

महाराष्ट्रातील 1 लाख अॅक्टिव रुग्ण चिंता वाढवत आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मध्य प्रदेश, गुजरात आणि हरियाणावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या राज्यात आरोग्य मंत्रालयाच्या 3 बैठका झाल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांनी सांगितले की, महाराष्ट्रात वाढत्या कोरोना केसेसमुळे चिंता वाढत आहे. यातून आपल्या दोन गोष्टी शिकायला मिळत आहेत. त्यातील एक म्हणजे कोरोना विषाणूबाबत बेजबाबदार बनू नका आणि दुसरा म्हणजे आपल्याला अजूनही कोरोना नियमांचे पालन करावेच लागेल. महाराष्ट्रात सर्वात खराब ट्रेन्ड पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या प्रकाराचा प्रादुर्भाव दिसत नाही. पण कमी चाचण्या आणि कोरोना नियमांचे मोठ्या प्रमाणात होत असलेले उल्लंघन होत असल्याचे आयसीएमआरचे डीजी डॉ. बलराम भार्गवर यांनी म्हटले आहे. तर कोणत्याही राज्यात कोरोना लसीची कमतरता नसल्याचेही केंद्राने म्हटले आहे.

सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात!

महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत समोर आलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत या राज्यांची टक्केवारी तब्बल 85.91 टक्के आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे एकूण 22 हजार 854 नवे रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक१४ हजार ६५९ (म्हणजे एकूण रुग्णसंख्येच्या जवळपास 60 टक्के) एकट्या महाराष्ट्रात सापडले आहे. त्यानंतर केरळमध्ये 2 हजार 475, आणि 1 हजार 393 रुग्ण आढळले आहेत. भारतात सध्या 1 लाख 89 हजार 226 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

या 8 राज्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ!

महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि हरियाणा या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत बदल होत आहे. केरळमध्ये अॅक्टिव्ह रुग्णसंख्या घटत आहे. तर महाराष्ट्रात रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here