मुंबईत मागील काही दिवसांपासून रुग्णांची घटलेली संख्या ही आता अजून कमी होऊ लागली आहे. शनिवारी जिथे दिवसभरात ५ हजार ८८८ रुग्ण आढळून आले होते, तिथे रविवारी ५ हजार ५४२ रुग्ण आढळून आले आहेत. तर मृतांचा आकडा सत्तरीच्या खाली आला आहे. त्यामुळे पुन्हा रुग्ण संख्या मागील दिशेने पाऊल टाकताना दिसत आहे. शनिवारी दिवसभरात जिथे ७१ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे रविवारी ६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबरोबरच दिवसभरात ८ हजार ४७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
अशी आहे स्थिती
मुंबईत शनिवारी दिवसभरात ५ हजार ५४२ रुग्ण आढळून आले. मागील चार दिवसांपासून साडेसात हजाराच्या आसपासच रुग्ण संख्या नियंत्रणात राखण्यात महापालिकेला यश आले आहे. मात्र, रविवारपर्यंत मुंबईत ७५ हजार ७४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. संपूर्ण दिवसभरात एकूण ४० हजार २९८ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर मृत रुग्णांचा आकडा ६४ एवढा आहे. या मृत्यू पावलेल्या रुग्णांमधील ३६ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे आहेत. या मृतांमध्ये ३६ पुरुष व २८ स्त्री रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील ५ रुग्ण हे ४० वर्षांखाली आहेत, तर ४२ रुग्ण हे ६० वर्षांवरील आहेत, तर ४० ते ६० वयोगटातील १७ रुग्ण आहेत. मुंबईतील विविध कोविड रुग्णालये व कोविड केंद्रांमध्ये २१ हजार ७०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Join Our WhatsApp Community