दिलासादायकः मुंबईत सलग दुस-या दिवशी रुग्णांची संख्या घटली!

त्यामुळे जर नियमांचे काटेकोर पालन केले, तर कोरोनाचा विनाश फार दूर नाही. 

122

मुंबईत मागील चार दिवसांपासून वाढलेल्या रुग्ण संख्येचा उतरता आलेख दिसत आहे. सोमवारी तर मुंबईकरांच्या आनंदाला पारावरच राहणार अशी संख्या दिसून आली आहे. मागील काही दिवसांपासून तापाने फणफणणाऱ्या मुंबईकरांनी, ‘श्वास’ रोखून धरावा अशी घटना घडली आहे. अकरा हजारापर्यंत वाढत जाणाऱ्या रुग्ण संख्येचा निर्देशांक अधिक वाढेल अशी भीती वर्तवली जात असतानाच, मागील काही दिवसांपासून ताप उतरताना दिसतो आणि सोमवारी तर दिवसभरात चक्क ३ हजार ८७६ रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात मृतांची संख्याही सत्तरीतच राहिली. त्यामुळे जर नियमांचे काटेकोर पालन केले, तर कोरोनाचा विनाश फार दूर नाही.

अशी आहे आकडेवारी

सोमवारी दिवसभरात एकूण ९ हजार १५० रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर ३ हजार ८७६ रुग्ण आढळून आले. सोमवारपर्यंत ७० हजार ३७३ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू होते. मात्र, दिवसभरात मागील एक ते दीड महिन्यांतील सर्वात कमी चाचण्या झाल्या. सोमवारी दिवसभरात केवळ २८ हजार ३२८ एवढ्या चाचण्या करण्यात आल्या. दिवसभरात ७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ४२ रुग्ण हे दीर्घकालीन आजारी होते, यामध्ये ४१ पुरुष व २९ महिला रुग्णांचा समावेश होता. यातील ३ रुग्ण हे ४० वर्ष वयोगटाच्या खालील आहेत, तर ४३ रुग्णांचे वय हे ६० वर्षांवरील होते. ४० ते ६० वयोगटातील मृतांचा आकडा हा २४ एवढा होता. मुंबईत मागील काही दिवसांपूर्वी रुग्ण दुप्पटीचा दर हा ४० दिवसांवर आलेला असताना सोमवारी हा दर ६२ दिवसांवर आला होता.

(हेही वाचाः गुड न्यूज…राज्यात गेल्या सहा दिवसांत ४ लाख ४२ हजार रुग्ण कोरोनामुक्त!)

सोमवारी पार पडले ४५ हजार ३२६ जणांचे लसीकरण

सोमवारी दिवसभरात एकूण ४५ हजार ३२६ जणांचे लसीकरण पार पडले. यामध्ये सुमारे २० हजार जणांनी पहिला डोस, तर २४ हजार ५०० जणांनी दुसरा डोस घेतला. यामध्ये ४५ ते ५९ वयोगटातील २४ हजार २७० जणांचे लसीकरण झाले तर ६० वर्षांवरील १७ हजार ७२० जणाांचे लसीकरण झाले. दिवसभरात आरोग्य विभागाच्या १ हजार ३०३ आणि फ्रंटलाईन वर्करपैकी २ हजार ३३ जणांचे लसीकरण पार पडले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.