मुंबईत मागील काही दिवसांपासून कोविड रुग्णांची संख्या पाचशेच्या खाली आली असून, रविवारी दिवसभरात ३६२ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे ३१ हजार ६०१ कोविड चाचण्या केल्यानंतरही ३६२ नवीन रुग्ण आढळून आल्याने मुंबईकरांच्या दृष्टीने ही आनंदाची बाब आहे. संपूर्ण मुंबईत विविध ठिकाणी ५ हजार ६१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातच झोपडपट्टी आणि चाळींची वाटचाल कोविडमुक्तीकडे होत आहे. संपूर्ण मुंबईत केवळ ३ झोपडपट्ट्या व चाळी या सक्रिय कंटेन्मेंट झोन आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही सुध्दा एक दिलासा देणारी गोष्ट आहे.
अशी आहे आकडेवारी
मुंबईत शनिवारी ३५ हजार २१ कोविड चाचण्या केल्यानंतर, ४१३ नवीन रुग्ण आढळून आले होते. तर रविवारी ३६२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ५३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, दिवसभरात १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये ८ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे आहेत. यामध्ये ५ पुरुष आणि ५ महिला रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये एका मृत रुग्णाचे वय हे चाळीशीच्या आतमध्ये आहे. तर ८ रुग्णांचे वय हे ६० वर्षांच्या पुढील आहे. एक रुग्ण हा ४० ते ६० वर्ष वयोगटातील आहे.
#CoronavirusUpdates
२५ जुलै, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण – ३६२
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ५३९
बरे झालेले एकूण रुग्ण – ७१०३४८
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७%एकूण सक्रिय रुग्ण- ५६१०
दुप्पटीचा दर- १२९९ दिवस
कोविड वाढीचा दर (१८ जुलै ते २४ जुलै)- ०.०५% #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 25, 2021
मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा ९७ टक्के एवढा झाला आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर हा १ हजार २९९ दिवस एवढा आहे. सक्रिय कंटेन्मेंट झोन असलेल्या झोपडपट्टी व चाळींची संख्या ३ एवढी आहे, तर इमारतींची संख्या ६१ एवढी आहे.
Join Our WhatsApp Community