मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा पारा आता चांगलाच उतरला असून, सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या १७००च्या आसपासच नोंदवली गेली. तर रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही कमी होऊन, तो मंगळवारी ५१ एवढा झाला होता.
अशी आहे मंगळवारची आकडेवारी
मंगळवारी दिवसभरात एकूण २८ हजार २५८ जणांची कोविड चाचणी करण्यात आली. तसेच मंगळवारी ६ हजार ८२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. रुग्णांचा आकडा दुसऱ्या दिवशीही स्थिर राहिला. सोमवारी जिथे १ हजार ७९४ रुग्ण आढळून आले होते, तिथे मंगळवारी १ हजार ७१७ रुग्ण आढळून आले.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 11, 2021
11th May, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) – 1,717
Discharged Pts. (24 hrs) – 6,082
Total Recovered Pts. – 6,23,080
Overall Recovery Rate – 92%
Total Active Pts. – 41,102
Doubling Rate – 170 Days
Growth Rate (4 May – 10 May) – 0.39%#NaToCorona
(हेही वाचाः पुणे आणि मंबई मॉडेल्सचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कौतुक! देश पातळीवर निर्माण केला आदर्श)
मृत्युही ओशाळला
सोमवारी जिथे मृतांचा आकडा ७४ एवढा होता. तिथे मंगळवारी ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २१ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे आहेत. यामध्ये ३५ पुरुष आणि १६ महिला रुग्णांचा समावेश आहे. तसेच चाळीशीच्या आतील सहा रुग्णांचा समावेश आहे. तर ६० वर्षांवरील २५ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या २० एवढी आहे.
(हेही वाचाः म्युकरमायकोसीस म्हणजे काय? काय आहेत लक्षणे? कसे दूर ठेवाल? वाचा उत्तरे…)
मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९२ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा १७० दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत ४७९ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून, झोपडपट्टी व चाळींची संख्या ही ८१ एवढी आहे.
Join Our WhatsApp Community