मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी ३००च्या खाली उतरली असून, सोमवारी दिवसभरात जिथे २५९ नवीन रुग्ण आढळून आले होते, तिथे मंगळवारी २८८ रुग्ण आढळून आले आहेत. तर ४१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर मंगळवारपर्यंत विविध ठिकाणी ४ हजार ६१६ कोविड रुग्णांवर उपचार सुरू होते. तर दिवसभरात बऱ्याच कालावधीनंतर मृतांचा आकडा कमी झाला आहे. मंगळवारी दिवसभरात ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
अशी आहे आकडेवारी
मुंबईत रविवारी जिथे ३३१ नवीन रुग्ण आढळून आले, तिथे सोमवारी २५९ नवीन रुग्णांची नोंद झाली होती. तर मंगळवारी २८८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये २ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे असून, यामध्ये २ पुरुष आणि १ महिला रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये दोन मृत रुग्णांचे वय हे चाळीशीच्या आतमध्ये, तर एका रुग्णाचे वय हे ६० वर्षांच्या पुढील होते.
#CoronavirusUpdates
३ ऑगस्त, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण – २८८
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ४१२
बरे झालेले एकूण रुग्ण – ७१२७२३
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७%एकूण सक्रिय रुग्ण- ४६१६
दुप्पटीचा दर- १५५५ दिवस
कोविड वाढीचा दर (२७ जुलै ते २ ऑगस्त)- ०.०४% #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 3, 2021
मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा ९७ टक्के एवढा आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा दर हा १५५५ दिवस एवढा आहे. तर सक्रिय कंटेन्मेंट झोन असलेल्या झोपडपट्टी व चाळींची संख्या २ एवढी आहे तर इमारतींची संख्या ४८ एवढी आहे.
Join Our WhatsApp Community