मुंबईत मागील दोन दिवसांपासून वाढलेला कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमी होऊ लागला आहे. शनिवारी जिथे मुंबईत २ हजार ६७७ रुग्ण होते, तिथे रविवारी २ हजार ४०३ रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी ६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, मागील काही दिवसांपूर्वी ९० हजारांच्या घरात गेलेली अॅक्टीव्ह म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता निम्म्यावर आली आहे. रविवारपर्यंत एकूण उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ४७ हजार ४१६ एवढी आहे.
अशी आहे रविवारची आकडेवारी
रविवारी दिवसभरात एकूण ३२ हजार ५९० जणांची कोविड चाचणी करण्यात आली. पण एवढ्या प्रमाणात चाचण्या करुनही दिवसभरात २ हजार ४०३ बाधित रुग्ण आढळून आले, तर ३ हजार ३७५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. मात्र, शनिवारी जिथे मृतांचा आकडा ६२ एवढा होता, तिथे रविवारी ६८ एवढा झाला आहे. यामध्ये ४० रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे होते. यामध्ये ४४ पुरुष आणि २४ महिला रुग्णांचा समावेश होता. तर चाळीशीच्या आतील पाच रुग्णांचा समावेश आहे. ६० वर्षांवरील ४२ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या २१ एवढी आहे.
(हेही वाचाः स्मशानभूमींबाहेर शववाहिकांच्या रांगा… पूर्वीच्या डॅशबोर्ड प्रणालीचा पडला विसर!)
मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९१ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा १५३ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत ५५३ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून, झोपडपट्टी व चाळींची संख्या ही ८९ एवढी आहे.
Join Our WhatsApp Community