मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा मागील दोन दिवसांपासून हजारांच्या आसपास आला असून मंगळवारी दिवसभरात १०३७ रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी जिथे ४८ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे मंगळवारी ३७ रुग्णांचा मुत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूचा आकडाही आता कमी होताना दिसत आहे.
अशी आहे आकडेवारी
सोमवारी जिथे १०५७ रुग्ण आढळून आले होते, तिथे मंगळवारी १०३७ रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात १ हजार ४२७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. मंगळवार पर्यंत संपूर्ण मुंबईत २७ हजार ६४९ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू होते. मंगळवारी दिवसभरात ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये २० रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे आहेत. यामध्ये २५ पुरुष आणि १२ महिला रुग्णांचा समावेश आहे, तर चाळीशीच्या आतील ३ रुग्णांचा समावेश आहे. ६० वर्षांवरील २३ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या ११ एवढी आहे.
#CoronavirusUpdates
२५ मे, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण – १०३७
२४ तासात बरे झालेले रुग्ण – १४२७
बरे झालेले एकूण रुग्ण – ६५५४२५
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९४%एकूण सक्रिय रुग्ण- २७६४९
दुप्पटीचा दर- ३४५ दिवस
कोविड वाढीचा दर ( १८ मे ते २४ मे)- ०.१९ % #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 25, 2021
मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९४ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा ३४५ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत २०६ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून, झोपडपट्टी व चाळींची संख्या ही ४४ एवढी आहे.
Join Our WhatsApp Community