मुंबईतील रुग्णसंख्या रविवारी पुन्हा वाढली

61

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १ हजार ४००च्या वर चढला आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आलेख वर खाली होत असून, शनिवारी दिवसभरात जिथे १ हजार २९९ रुग्ण आढळून आले होते, तिथे रविवारी १ हजार ४३१ रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात ४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अशी आहे आकडेवारी

शनिवारी जिथे २९ हजार २६४ कोरोना चाचणी करण्यात येऊन, १ हजार २९९ रुग्ण आढळून आले. तर रविवारी २३ हजार ३१४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आणि दिवसभरात १ हजार ४३१ रुग्ण आढळून आले. रविवारी दिवसभरात १ हजार ४७० रुग्ण बरे होऊन घरी परतले. रविवार पर्यंत संपूर्ण मुंबईत २८ हजार ४१० रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. शनिवारी जिथे ५२ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे रविवारी हा आकडा कमी झाला आहे. रविवारी दिवसभरात ४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये २५ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे आहेत. यामध्ये २३ पुरुष आणि २६ महिला रुग्णांचा समावेश असून, चाळीशीच्या आतील ५ रुग्णांचा समावेश आहे. तर ६० वर्षांवरील २७ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या १७ एवढी आहे.

मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९३ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा ३३१ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत २१९ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून, झोपडपट्टी व चाळींची संख्या ही ५३ एवढी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.