मुंबईत मुत्यूचा आकडा घटताच, पण…

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा मागील दोन दिवसांपासून हजाराच्या आसपास असतानाच पुन्हा एकदा रुग्णसंख्येने उसळी घेत ती १४००च्या आसपास पोहोचली आहे. मंगळवारी दिवसभरात जिथे १०३७ रुग्ण आढळून आले होते, तिथे बुधवारी १३६२ रुग्ण आढळले आहेत. तर मृतांचा आकडा पुन्हा एकदा कमी झाला आहे. मंगळवारी जिथे ३७ रुग्णांचा मुत्यू झाला होता, तिथे बुधवारी ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्णवाढीच्या आकड्यांचे तापमान कमी जास्त होत असले, तरी रुग्णांच्या मृत्यूचा आकडा घटत असल्याने मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे.

अशी आहे आकडेवारी

बुधवारी दिवसभरात १३६२ रुग्ण आढळून आले आहेत, तर दिवसभरात १ हजार २१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. बुधवारपर्यंत संपूर्ण मुंबईत २७ हजार ९४३ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. दिवसभरात २९ हजार ५८९ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. बुधवारी दिवसभरात ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यू पावलेल्या रूग्णांमध्ये २५ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे असून, यामध्ये १६ पुरुष आणि २८ महिला रुग्णांचा समावेश आहे. तर चाळीशीच्या आतील ४ रुग्णांचा समावेश आहे. ६० वर्षांवरील १८ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या १२ एवढी आहे.

मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९४ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा ३४८ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत २०० इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून झोपडपट्टी व चाळींची संख्या ही ४४ एवढी आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here