मुंबईत कोरोना रुग्ण आणि मृतांच्या आकड्याने पुन्हा चढली शिडी

105

मुंबईतील रुग्णसंख्या ७०० च्या खाली आलेली असतानाच, ती पुन्हा एकदा हजाराच्या दिशेने पुढे सरकताना दिसत आहे. त्यामुळे मंगळवारी जिथे ही रुग्णसंख्या ८३१ होती, तिथे बुधवारी संपूर्ण दिवसभरात ९२५ रुग्ण आढळून आले आहेत, तर ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अशी आहे संख्या

बुधवारी संपूर्ण दिवसभरात १ हजार ६३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. मंगळवारी दिवसभरात जिथे २३ हजार ५०३ चाचण्या करण्यात आल्या होत्या, तिथे बुधवारी २४ हजार ७३२ चाचण्या करण्यात आल्या. बुधवारपर्यंत विविध रुग्णालयांमध्ये १६ हजार ५८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी जिथे २३ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे बुधवारी ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २३ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे आहेत. यामध्ये १५ पुरुष आणि १६ महिला रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये ४० वर्षांखाली एका रुग्णाचा समावेश आहे, तर ६० वर्षांवरील १८ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या १२ एवढी आहे.

मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९५ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा ४७७ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत १५३ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून, झोपडपट्टी व चाळींची संख्या ही ३० एवढी आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.