मुंबईत कोरोनाचा ताप पुन्हा वाढला

79

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णसंख्या ६०० च्या घरात आलेली असून, पुन्हा हा आकडा ८०० च्या वर सरकला आहे. बुधवारी दिवसभरात ८३० रुग्ण आढळून आले आहेत, तर दिवसभरात १३०० रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर दिवसभरात ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अशी आहे रुग्णसंख्या

मंगळवारी संपूर्ण दिवसभरात जिथे ५७५ रुग्ण आढळून आले होते, तिथे बुधवारी ८३० रुग्ण आढळून आले. तर संपूर्ण दिवसभरात २३ हजार ६८१ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. बुधवारपर्यंत १४ हजार ९०७ रुग्णांवर उपचार सुरू असून, दिवसभरात १३०० रुग्ण बरे होऊन घरी परतले. मंगळवारी जिथे १४ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे बुधवारी ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १० रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे आहेत. यामध्ये ५ पुरुष आणि ६ महिला रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये ६० वर्षांवरील १० रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या १ एवढी आहे.

मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९५ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा ७२७ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत ८० इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून झोपडपट्टी व चाळींची संख्या ही २० एवढी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.