मुंबईतील रुग्ण संख्या तीन हजारातच, शुक्रवारी ७१ रुग्णांचा मृत्यू!

77

मुंबईत गुरुवारप्रमाणेच शुक्रवारीही रुग्ण संख्या स्थिरच राहिली. गुरुवारी ३ हजार ५६ रुग्ण आणि ६९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती, तिथे शुक्रवारी ३ हजार ३९ एवढे रुग्ण, तर ७१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना अजूनही दीर्घश्वास रोखून असल्याचे चित्र मुंबईत पहायला मिळत आहे.

अशी आहे स्थिती

मुंबईत शुक्रवारी ३ हजार ३९ एवढे रुग्ण आढळून आले. मात्र, शुक्रवारी दिवसभरात एकूण ४ हजार ५२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. मात्र, शुक्रवारपर्यंत ४९ हजार ४९ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू होते. तर शुक्रवारी दिवसभरात जिथे ३५ हजार २२४ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या, तर दिवसभरात ७१ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये ४३ रुग्ण हे दीर्घकालीन आजारी होते. यामध्ये ४५ पुरुष व २६ महिला रुग्णांचा समावेश होता. यातील ३ रुग्ण हे ४० वयोगटाच्या खालील आहेत, तर ४९ रुग्णांचे वय हे ६० वर्षांवरील होते. ४० ते ६० वयोगटातील मृतांचा आकडा हा १९ एवढा होता. मुंबईत रुग्ण दुप्पटीचा दर गुरुवारी जिथे १३० दिवसांवर आला होता, तो वाढून १३८ दिवस एवढा झाला आहे.

(हेही वाचाः जंबो कोविड सेंटरचे कंत्राट मर्जीतील कंत्राटदारांना देण्याचा घाट! भाजपचा आरोप)

एकेवेळी मुंबईतील सिल इमारती आणि मायक्रो कंटेन्मेंट झोनची संख्या १२०० वर पोहोचली होती, तिथे ही संख्या आता निम्म्यावर आल्याचे पहायला मिळत आहे. शुक्रवारपर्यंत संपूर्ण मुंबईत ६१७ सिल इमारती आणि मायक्रो कंटेन्मेंट झोनची संख्या होती, तर कंटेन्मेंट झोन झालेल्या झोपडपट्टींची संख्या ९६ एवढी होती.

दादर,माहिम आणि धारावी शंभरीच्या आतच

मुंबईत मागील काही दिवसांपासून दीडशेच्या आत आलेली माहिम, दादर आणि धारावी या जी-उत्तर विभागातील रुग्ण संख्या शुक्रवारी निम्यावर आलेली पहायला मिळाली आहे. शुक्रवारी या तिन्ही विभागांमध्ये एकूण ७९ रुग्ण आढळून आले आहेत. या तिन्ही विभागांमध्ये सध्या एकूण ४ हजार ५९० रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. यात धारावीमध्ये १८ रुग्ण, दादरमध्ये २२ आणि माहिममध्ये ३९ अशाप्रकारे एकूण ७९ रुग्णंची नोंद झालेली आहे. दादरमधील पहिल्या ड्राईव्ह इन लसीकरणामध्ये दिवसभरात ५१९ जणांचे लसीकरण पार पडले. २८९ वाहनांमधून आलेल्या ५१९ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला असल्याची माहिती जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.