मुंबईत मागील काही महिन्यांपासून कोविड रुग्ण संख्येचा आलेख कमी होत असून, सोमवारी दिवसभरात १९० रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात २६ हजार ४८४ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर, मुंबईत १९० बाधित रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारपर्यंत संपूर्ण मुंबईत २ हजार ७४९ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. तसेच सोमवारपर्यंत झोपडपट्टी व चाळी कोरोनामुक्त झालेल्या असून एकही झोपडपट्टी कंटेन्मेंट झोनमध्ये नाही.
अशी आहे आकडेवारी
मुंबईतील कोविड रुग्णांची संख्या कमी होत असल्याने, टप्प्याटप्याने निर्बंध शिथिल केले जात आहेत. दुकाने, हॉटेल्स खुली केल्यानंतर आता चौपाटी, उद्याने व मैदानेही रात्री १० वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सोमवारपर्यंत प्राप्त झालेल्या कोविडबाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण मुंबईत फक्त पावणे तीन हजार रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. दिवसभरात १९० नवीन बाधित रुग्ण आढळून आले, तर २७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
#CoronavirusUpdates
१६ ऑगस्त, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण- १९०
२४ तासात बरे झालेले रुग्ण- २७१
बरे झालेले एकूण रुग्ण – ७१८३५४
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७%एकूण सक्रिय रुग्ण- २७४९
दुप्पटीचा दर- १९६६ दिवस
कोविड वाढीचा दर (९ ऑगस्त ते १५ ऑगस्त)- ०.०४% #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 16, 2021
(हेही वाचाः मुलांना मॉलमध्ये घेऊन जाताय? तर ‘हे’ सोबत बागळा)
झोपडपट्टी कोविडमुक्त
संपूर्ण दिवसभरात ३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. यामधले तिन्ही रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे होते. यामध्ये २ रुग्ण पुरुष असून, एका महिला रुग्णाचा समावेश आहे. यातील एक रुग्ण साठीच्या पुढील असून, दोन रुग्ण चाळीस ते साठ वयोगटातील आहेत. चाळी व झोपडपट्टी परिसर आता कोविडमुक्त होऊ लागल्या असून, सक्रिय कंटेन्मेंट झोनमुक्त असे हे परिसर बनले आहेत. दिवसभरात एकही झोपडपट्टी व चाळ सक्रिय कंटन्मेंट झोनमध्ये नव्हते. तर कंटेन्मेंट झोन असलेल्या इमारतींची संख्या २१ एवढी आहे.
Join Our WhatsApp Community