मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा कमी झालेला पारा पुन्हा काही प्रमाणात वाढला होता. पण पुन्हा एकदा तो कमी झालेला पहायला मिळत आहे. शुक्रवारी दिवसभरात मुंबईत १ हजार ६५७ रुग्ण आढळून आले, तर ६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अशी आहे शुक्रवारची आकडेवारी
मुंबईत शुक्रवारी एकूण २५ हजार २०५ जणांची कोविड चाचणी करण्यात आली, तर २ हजार ५७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. गुरुवारी जिथे १ हजार ९४६ रुग्ण आढळून आले होते, तिथे शुक्रवारी हा आकडा १ हजार ६५७ येवढा आढळून आला. गुरुवारी जिथे मृतांचा आकडा ६८ एवढा होता, तिथे शुक्रवारी मृतांचा आकडा हा ६२ एवढा आहे. यामध्ये ३१ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे आहे. यामध्ये ३८ पुरुष आणि २४ महिला रुग्णांचा समावेश आहे. तर चाळीशीच्या आतील सहा रुग्णांचा समावेश आहे, ६० वर्षांवरील ३४ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या २२ एवढी आहे.
(हेही वाचाः आदित्य ठाकरे ‘झूम’ करुन ठेवतात मुंबईवर ‘वॉच’!)
मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९२ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा १९९ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत ३७७ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून, झोपडपट्टी व चाळींची संख्या ही ८५ एवढी आहे.
Join Our WhatsApp Community