मुंबईत मागील तीन दिवसांमध्ये रुग्ण संख्या चांगल्याप्रकारे नियंत्रणात राखण्यात महापालिकेला यश येत आहे. शनिवारी ८ हजार ८३४ रुग्ण आढळून आले होते, तर रविवारी मुंबईत ८ हजार ४७८ रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईकरांसाठी रुग्णांची ही आकडेवारी समाधान देणारी आहे. दिवसभरात ८ हजार ७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी ५०हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अशी आहे स्थिती
मुंबईत रविवारी दिवसभरात ८ हजार ७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दिवसभरात ५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्यांमध्ये २६ रुग्ण हे दीर्घकालीन आजार असलेले होते. तर यामध्ये ३६ पुरुष आणि १७ रुग्ण महिलांचा समावेश आहे. १६ रुग्ण हे ४० ते ६० वयोगटातील असून २ रुग्ण हे ४० वर्षांखालील वयोगटातील होते. तर दिवसभरात शनिवारच्या तुलनेत रविवारी कमी चाचण्या झाल्या आहेत. शनिवारी दिवसभरात ४७ हजार २५३ चाचण्या करण्यात आल्या होत्या, तर रविवारी ४६ हजार ९७१ चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत रुग्ण बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ८२ टक्के एवढा आहे, तर कोविड वाढीचा दर हा १.५३ टक्के एवढा आहे. दुप्पटीचा दर पुन्हा वाढून ४५ दिवसाांवर आला आहे.
मुंबईतील १०० झोपडपट्ट्या, चाळी कंटेन्मेंट झोनमध्ये
मुंबईत रविवारपर्यंत १०० झोपडपट्ट्या व चाळी या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत १ हजार १८८ इमारती या सीलबंद करण्यात आल्या आहेत. तर दिवसभरात अती जोखमीच्या ३६ हजार ३५६ लोकांचा शोध घेण्यात आला असून, त्याातील १ हजार ६१ लोकांना सीसीसी-वन मध्ये दाखल करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community