मुंबईत ५५५ नवीन रुग्ण, लवकरच लेव्हल-2 मध्ये येण्याची शक्यता

मुंबईत रविवारी ५५५ कोविड रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात ६६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दिवसभरात एकूण  ३४ हजार ९८० कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील आकडा हा पाचशे ते सहाशेच्या आतच सीमित  असून ऑक्सिजन रुग्णखाटांची आवश्यकता आता कमी भासू लागल्याने येत्या दिवसांमध्ये मुंबई लेव्हल दोनमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशी आहे आकडेवारी

मुंबईमध्ये रविवारपर्यंत ७३५४ रुग्णांवर विविध कोविड सेंटर तथा रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तर दिवसभरात ५५५ नवीन रुग्णांची भर पडली आहे. रविवारी दिवसभरात १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दिवसभरात ५०४ नवीन रुग्णांची भर पडली होती, तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. रविवारी मृत्यू झालेल्या  १५ रुग्णांपैकी १२ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. यामध्ये ११ पुरुष, तर ४ महिला रुग्णांचा समावेश आहे. मृत्यू पावलेल्यांमध्ये ३ रुग्ण हे चाळीशीच्या आतील आहेत. तर १० रुग्ण हे साठी पार केलेले आहेत. उर्वरित  २ रुग्ण हे ४० ते ६० वर्ष वयोगटातील आहेत.

मुंबईतील रुग्णांचा बरे होण्याचा दर हा ९६ टक्के आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर हा ९२८ दिवसांवर आला आहे. झोपडपट्टी व चाळींमधील सक्रीय कंटेन्मेंटची संख्या अवघ्या पाचवर आली आहे. तर इमारतींची संख्या ही ६८ वर आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here