मुंबईत रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच

मुंबईतील कोरोना रुग्ण वाढीचा आकडा कमी-जास्त होत आहे. रविवारी मुंबईत एकूण ७३३ रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात ६५० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. संपूर्ण दिवसभरात २८ हजार २२६ लोकांच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत.

अशी आहे आकडेवारी

मुंबईत रविवारपर्यंत १४ हजार ८०९ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. शनिवारी मुंबईत जिथे ६९६ रुग्ण आढळून आले होते, तिथे रविवारी ७३३ रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात १९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये १५ मृत रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे आहेत. मृतांमध्ये ११ पुरुष आणि ८ महिला रुग्णांचा समावेश आहे. तर ४ मृत रुग्ण हे ४० वयोगटाच्या खालील आहेत. ९ रुग्ण हे ६० वर्षांवरील असून, ७ मृत रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते.

मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९५ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा ७२६ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत ८० इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून, झोपडपट्टी व चाळींची संख्या १५ एवढी आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here