मुंबईतील रुग्णसंख्या हजाराच्या आसपास स्थिरावलेली असतानाच, गुरुवारी संपूर्ण दिवसभरात ९६१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बुधवारी जिथे संपूर्ण दिवसभरात ९२५ रुग्ण आढळून आले होते, तिथे गुरुवारी ९६१ रुग्ण आढळून आले. तर संपूर्ण दिवसभरात २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अशी आहे आकडेवारी
गुरुवारी संपूर्ण दिवसभरात ८९७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर बुधवारप्रमाणेच गुरुवारीही कोविड चाचण्या करण्यात आल्या. बुधवारी जिथे २४ हजार ७३२ चाचण्या करण्यात आल्या होत्या, तिथे गुरुवारी २४ हजार ६६७ चाचण्या करण्यात आल्या आहेत. गुरुवारपर्यंत विविध रुग्णालयांमध्ये १६ हजार ६१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी जिथे ३१ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे गुरुवारी २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १८ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे आहेत. यामध्ये १८ पुरुष आणि ९ महिला रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये ४० वर्षांखाली एका रुग्णाचा समावेश असून, ६० वर्षांवरील २० रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या ६ एवढी आहे.
#CoronavirusUpdates
३ जून, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण – ९६१
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ८९७
बरे झालेले एकूण रुग्ण – ६७५१९३
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९५%एकूण सक्रिय रुग्ण- १६६१२
दुप्पटीचा दर- ५०० दिवस
कोविड वाढीचा दर ( २७ मे ते २ जून)- ०.१३ % #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 3, 2021
मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९५ टक्के एवढा आहे. मुंबईतील दुपटीचा दर हा ५०० दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत १४५ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून झोपडपटी व चाळींची संख्या ही ३३ एवढी आहे.
Join Our WhatsApp Community