मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी रुग्णांचा आकडा हजाराच्या खालीच

मुंबईतील रुग्णसंख्या हजाराच्या आसपास स्थिरावलेली असतानाच, शुक्रवारी संपूर्ण दिवसभरात ९७३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे गुरुवारी जिथे ९६१ रुग्ण आढळून आले होते, तिथे शुक्रवारी दिवसभरात ९७३ रुग्ण आढळून आले. तर संपूर्ण दिवसभरात २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अशी आहे आकडेवारी

शुक्रवारी संपूर्ण दिवसभरात १ हजार २०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर संपूर्ण दिवसभरात २७ हजार ३५१ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. शुक्रवारपर्यंत १६ हजार ३४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी जिथे २७ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे शुक्रवारी २४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये १४ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे आहेत. यामध्ये १२ पुरुष आणि १२ महिला रुग्णांचा समावेश आहे. ४० वर्षांखाली २ रुग्णांचा समावेश असून, ६० वर्षांवरील १० रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या १२ एवढी आहे.

मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९५ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा ५१५ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत १२६ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून, झोपडपट्टी व चाळींची संख्या ही ३१ एवढी आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here