मुंबईतील रुग्णांची संख्या गुरुवारी ६६६ एवढी आढळून आली असून, दिवसभरात ७४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर दिवसभरात २० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे कमी होणारा मृत्यूचा आकडा वाढलेला पहायला मिळत आहे.
अशी आहे आकडेवारी
बुधवारी मुंबईत जिथे ८३० रुग्ण आढळून आले होते, तिथे गुरुवारी रुग्णसंख्या कमी होऊन ६६६ रुग्ण आढळून आले. तर संपूर्ण दिवसभरात २९ हजार ३०९ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. गुरुवार पर्यंत १४ हजार ८०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी जिथे ११ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे गुरुवारी २० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये १३ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे आहेत. यामध्ये १० पुरुष आणि १० महिला रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये ४ रुग्ण हे ४० वर्षांखालील वयोगटातील आहेत. तर ६० वर्षांवरील ९ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या ७ एवढी आहे.
#CoronavirusUpdates
१७ जून, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण – ६६६
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ७४१
बरे झालेले एकूण रुग्ण – ६८६८६६
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९५%एकूण सक्रिय रुग्ण- १४८०७
दुप्पटीचा दर- ७३४ दिवस
कोविड वाढीचा दर ( १० जून ते १६ जून)- ०.०९ % #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 17, 2021
मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९५ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा ७३४ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत ८१ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून, झोपडपट्टी व चाळींची संख्या १८ एवढी आहे.
Join Our WhatsApp Community