अशी आहे मुंबईतील गुरुवारची रुग्णसंख्या

72

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा कमी झालेला आकडा पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. बुधवारी जिथे मुंबईत १३५० रुग्ण आढळले होते, तिथे गुरुवारी १४२५ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच गुरुवारी दिवसभरात ५९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

अशी आहे आकडेवारी

गुरुवारी दिवसभरात एकूण २९ हजार ३९१ जणांची कोविड चाचणी करण्यात आली. तर गुरुवारी १ हजार ४६० रुग्ण बरे होऊन घरी परतले. गुरुवार पर्यंत संपूर्ण मुंबईत २९ हजार ५१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी जिथे मृतांचा आकडा ५७ एवढा होता, तिथे गुरुवारी ५९ रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ४३ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे होते. यामध्ये ३६ पुरुष आणि २३ महिला रुग्णांचा समावेश आहे. तर चाळीशीच्या आतील २ रुग्णांचा समावेश आहे. ६० वर्षांवरील ३९ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या १८ एवढी आहे.

मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९३ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा २९७ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत २७६ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून, झोपडपट्टी व चाळींची संख्या ही ७३ एवढी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.