सध्या कोरोना विषाणूचे नवे स्वरूप समोर आले आहे. डेल्टा प्लस असे या विषाणूचे नाव असून हा विषाणू आता सध्याच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींवर भारी पडतोय का, अशी शंका यावी, अशी परिस्थिती दिसत आहे. कारण कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांना डेल्टा प्लस या विषाणूने गाठले आहे. देशात तब्बल ८७ हजार जणांना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
सर्वच लसींबाबत प्रश्नचिन्ह!
देशातील आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार पहिल्या डोस घेतलेल्या १ लाख ७१ हजार ५११ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या ८७ हजार ४९ जणांना कोरोनाच्या विषाणूची बाधा झाल्याचे सांगण्यात आले आहे. सर्व लसींबाबत सारखाच अनुभव देशातील बहुतांश नागरिकांनी कोव्हिशिल्ड लस घेतली आहे. त्याखालोखाल कोव्हॅक्सिन आणि सर्वात कमी संख्या स्पुटनिक-व्ही ही लस घेतलेल्या नागरिकांची आहे. मात्र या तिन्ही लसी घेतलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजेच लसीकरण झाल्यानंतर कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण हे ०.०८४ असल्याचे समोर आले आहे.
(हेही वाचा : शाळा उघडण्याबाबत लवकरच होणार निर्णय?)
केरळमध्ये सर्वाधिक ४६ टक्के रुग्ण
हा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर लसीचे दोन्ही डोस घेतले म्हणून गाफील राहू नका, असा संदेश एक प्रकारे यातून मिळाला आहे. त्यामुळे कोरोनासंबंधीच्या नियमांचे पालन करण्याबाबत आता हलगर्जीपणा करणे चुकीचे ठरणार आहे. आतापर्यंत देशात ८७ हजारांहून अधिक लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे डोस घेवूनही कोरोना झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. चिंतेची बाब म्हणजे यातील ४६ टक्के रुग्ण हे एकट्या केरळमधील राज्यातील आहेत, तर ५४ टक्के रुग्ण देशातील इतर भागातील आहेत. त्यामुळे आता आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
देशात बनला चिंतेचा विषय
केरळमध्ये लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ८० हजार जणांना, तर दोन्ही डोस घेतलेल्या ४० हजार नागरिकांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना झालेल्या २०० नमुन्यांची जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आली आहे. पण आतापर्यंत कोणत्याही कोरोनाचा नवीन विषाणूचा उलगडा झालेला नाही. देशात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा वेग कमी झाला आहे. देशभरात घटत्या रुग्णसंख्येमुळे दिलासा मिळत असला तरी लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोना संसर्ग होत असल्याने चिंतेचा विषय बनला आहे.
Join Our WhatsApp Community