मुंबईतील कोविडचा ताप या बुधवारीही पाचशेपार

संपूर्ण मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्याही आता साडेचार हजारांच्या पार गेलेली पहायला मिळत आहे.

मागील काही दिवसांपासून गणेशोत्सवात कोविडबाधित रुग्णांची कमी झालेली रुग्णसंख्या आता पुन्हा वाढू लागली आहे. मागील तीन ते चार दिवसांमध्ये कोविड चाचण्यांची संख्या घटल्यामुळे रुग्ण संख्येचा आकार कमी झाल्याचे पहायला मिळत होते. बुधवारी देखील कोविड चाचण्यांची संख्या कमी असूनही रुग्ण संख्या वाढलेली पहायला मिळत आहे. बुधवारी दिवसभरात तब्बल ५१४ नवीन रुग्ण आढळून आले असून, संपूर्ण मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्याही आता साडेचार हजारांच्या पार गेलेली पहायला मिळत आहे.

(हेही वाचाः दिलासादायक बातमी! तिसऱ्या लाटेची शक्यता कमी!)

किती आहे रुग्णसंख्या?

मुंबईत मागील बुधवारी कोविड रुग्ण संख्येने पाचशेचा आकडा पार केला होता. मागील बुधवारी ४८ हजार ५२१ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर ५३० नवीन बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा या बुधवारी आढळून आलेल्या नवीन रुग्णसंख्येने पाचशे पारचा पल्ला गाठला आहे. या बुधवारी २९ हजार ८८६ चाचण्या करण्यात आल्यानंतर ५१४ नवीन रुग्ण आढळून आले होते. योगायोगाने मागील बुधवारीही मृतांचा आकडा चार एवढाच होता आणि या बुधवारीही चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

(हेही वाचाः ‘या’ राज्यात ड्रोनद्वारे पोहोचणार लस… काय आहे उपक्रम?)

असा आहे बरे होण्याचा दर

बुधवारी ५१४ नवीन रुग्ण आढळून आले असून, ६०४ बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मृत पावलेल्या ४ रुग्णांपैकी चारही रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. यामध्ये दोन महिला व दोन पुरुष रुग्णांचा समावेश आहे. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के एवढा असून, झोपडपट्टी व चाळींच्या सक्रिय कंटेन्मेंटची संख्या ही शून्यावरच आहे. सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ही ३७ एवढी आहे.

मागील ८ दिवसांमधील रुग्ण संख्या, चाचण्या आणि मृत्यूचा आकडा

बुधवार १५ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ५१४ (चाचण्या : २९, ८८६), मृत्यू -४

मंगळवार १४ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ३६७ (चाचण्या : २८, ४९८), मृत्यू -५

सोमवार १३ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ३४७ (चाचण्या : २५, ५८१), मृत्यू -६

रविवार १२ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ३५४(चाचण्या : २९,८४९), मृत्यू -७

शनिवार ११ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ३६५ (चाचण्या : ३५,८५१), मृत्यू -४

शुक्रवार १० सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ४४१ (चाचण्या :४९,९२१), मृत्यू -५

गुरुवार ९ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ४५८(चाचण्या : ४८,७१२), मृत्यू-६

बुधवार ८ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ५३०(चाचण्या : ४८,५२१), मृत्यू -४

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here