राज्याच्या उपराजधानीतही कोरोना रुग्णांची संख्या वाढली

राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात बीए व्हेरिएंटचा फैलाव वाढलेला असताना, आता उपराजधानी नागपुरासह छोट्या शहरांत आणि गावांमध्ये कोरोनाचा विळखा वाढू लागला आहे. गेल्या तीन दिवसांपासून नागपुरातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या हजारीपार गेल्याने उपराजधानीतही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले.

कोरोना रुग्णांची संख्या हजारीपार

मुंबई, पुणे, ठाण्यातील रुग्णसंख्या घटत असली तरीही या तीन प्रमुख शहरांच्या तुलनेत गेल्या तीन दिवसांपासून नागपुरात कोरोनाची संख्या हजारीपार सातत्याने वाढत आहे. १५ जुलै रोजी नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या १००६ वर नोंदवली गेली. दुस-या दिवशी १६ जुलैला कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ४६ पर्यंत पोहोचली. तर रविवारी नागपुरात १ हजार १८६ कोरोना रुग्णांवर उपचार दिले जात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत १०० ते २०० पर्यंत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. राज्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नंदुरबार, बीड, हिंगोली, नांदेड तर विदर्भातील यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांतील रुग्णसंख्या केवळ शंभरच्या खाली आहे.

दोनशेच्यावर रुग्णसंख्या असलेले जिल्हे 

पालघर – २०१, सातारा- २६८, जालना – २२५, वाशिम – २५५, बुलडाणा – २१०

तीनशे ते चारशेच्या वर रुग्णसंख्या असलेले जिल्हे 

रायगड – ४४७, सोलापूर – ३२२, अहमदनगर – ४००, औरंगाबाद – ३६५

पाचशेच्यावर रुग्णसंख्या असलेले जिल्हे

नाशिक – ६६५, मुंबई – २३००, ठाणे – १२७०, पुणे – ५५४५, नागपूर – ११८६

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here