मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा एक हजाराच्या खाली आलेला असतानाच, पुन्हा एकदा कासवगतीने हजाराच्यावर आकडा वाढताना दिसत आहे. शनिवारी दिवसभरात जिथे १०४८ रुग्ण आढळून आले होते, तिथे रविवारी १०६६ रुग्ण आढळून आले आहेत. तर रविवारी दिवसभरात २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्ण संख्येचा आकडा पाऱ्याप्रमाणे वर खाली होत असला, तरी मृत्यूचा आकडा कमीच होताना दिसत आहे.
अशी आहे संख्या
रविवारी दिवसभरात २४ हजार ५४८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये १ हजार ६६ रुग्ण बाधित आढळून आले, तर दिवसभरात १ हजार ३२७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रविवारपर्यंत संपूर्ण मुंबईत विविध ठिकाणी २७ हजार ३२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी जिथे २५ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे रविवारी २२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये १८ रुग्ण हे दीर्घकालिन आजाराचे असून, यामध्ये १३ पुरुष आणि ९ महिला रुग्णांचा समावेश आहे. तर ६० वर्षांवरील १५ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या ७ एवढी आहे.
#CoronavirusUpdates
३० मे, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण – १०६६
२४ तासात बरे झालेले रुग्ण – १३२७
बरे झालेले एकूण रुग्ण – ६६१२२६
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९४%एकूण सक्रिय रुग्ण- २७३२२
दुप्पटीचा दर- ४१४ दिवस
कोविड वाढीचा दर ( २३ मे ते २९ मे)- ०.१६ % #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 30, 2021
मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९४ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा ४१४ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत १६० इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून, झोपडपट्टी व चाळींची संख्या ही ३८ एवढी आहे.
Join Our WhatsApp Community